spot_img
महाराष्ट्रसणाला गालबोट! दोन गटात राडा; वाद सोडवणे पोलिसाला भोवले

सणाला गालबोट! दोन गटात राडा; वाद सोडवणे पोलिसाला भोवले

spot_img

नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
बिहारच्या मुंगेरमध्ये दोन गटाचा वाद सोडवायला गेलेल्या सहायक पोलीस निरीक्षकांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. एका तरुणाने धारदार शस्त्रांनी त्यांच्या डोके आणि मानेवर हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकांना जवळील रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. सहायक पोलीस निरीक्षकांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे.

सहायक पोलीस निरीक्षक संतोष कुमार हे गावात सुरु असलेला दोन गटाचा वाद सोडवायला गेले. त्यावेळी एका गटाच्या तरुणाने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पोलिसांनी आरोपींवर गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांना हल्ला केल्यानंतर आरोपी आणि त्याचं कुटुंब फरार झालं आहे. पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी टीम गठीत केली आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. शुक्रवारी सांयकाळी ७.४५ वाजता ही घटना घडली. बिहारमधील नंदलालपूर गावात ही घटना घडली. गावात दोन गटात हाणामारी झाली. त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांच्या ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर माहिती दिली. दोन गटाच्या वादाची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक संतोष कुमार घटनास्थळी पोहोचले.

गावातील दोन गटाचा वाद सोडवण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक संतोष कुमार पुढे आले. त्यावेळी एका गटातील व्यक्तीने त्यांच्या धारदार शस्त्राने हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात संतोष कुमार गंभीर जखमी झाले. हल्ला केल्यानंतर आरोपी तरुण आणि त्याच्या कुटुंबीयातील सदस्यांनी गावातून पळ काढला. हल्ल्यात जखमी झालेल्या संतोष कुमार यांना इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती पाहून त्यांना पाटणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर संतोष कुमार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

१ एप्रिलपासून FASTag अनिवार्य; अन्यथा दुप्पट टोल भरावा लागणार, काय आहेत नियम

मुंबई / नगर सह्याद्री : महाराष्ट्र शासनाने फास्टॅगसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.आता १ एप्रिलपासून प्रत्येक...

कृषिमंत्री कोकाटे यांच्या अडचणीत वाढ! हायकोर्टात याचिका..

Manikrao Kokate: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोकाटे यांच्याविरोधात उच्च न्यायालयात...

शिवसेना खंबीरपणे गोरक्षकांच्या पाठीशी: काळे

माजी मंत्री अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त सावेडीतील सतनाम साक्षी गोशाळेत चारावाटप अहिल्यानगर । नगर...

औरंगजेबाची कबर हटवा; बजरंग दल मैदानात!

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- वर्तमान राज्य सरकार व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर...