अहिल्यानगर | नगर-सह्याद्री
नगर-पुणे महामार्गावरील सीना नदी पुलावर बुधवारी (दि. ६ ऑगस्ट) सकाळी एक भीषण अपघात घडला. दरेवाडी परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी निघालेली स्कूल व्हॅन अनियंत्रित होऊन पुलावर अपघातग्रस्त झाली. सुदैवाने व्हॅनमध्ये विद्यार्थी नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.
या अपघातात स्कूल व्हॅनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, चालक गंभीर जखमी झाला आहे. त्यास तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
पुलावर वाहनाचा चक्काचूर झालेला अवस्थेतील दृश्य पाहून नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अपघात नेमका कशामुळे घडला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. घटनेची माहिती संबंधित पोलिस ठाण्यास देण्यात आली असून, अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.