Wedding Heart Attack News: सर्वांना धक्का बसेल अशी एक घटना घडली आहे. लग्नघरावर अचानक शोककळा पसरली. मुलीच्या लग्नातील विधी पूर्ण केल्यानंतर तिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे वधू आणि वर पक्षाकडील नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
तेलंगणाच्या कामारेड्डी जिल्ह्यातील बिकानूरमधील रामेश्वरपल्ली गावात राहणाऱ्या बालचंद्रम यांच्या मुलीचा विवाह सोहळा बीटीएस चौकातील एका सभागृहात आयोजित करण्यात आला होता. लग्नाचे विधी सुरू असताना, बालचंद्रमयांनी मुलीचे पाय धुतले आणि काही वेळातच त्यांना हृदयविकाराचाझटका आला. यातच त्यांचे निधन झाले.
लग्न मंडपात उपस्थित नातेवाईक आणि आप्तेष्टांनी बालचंद्रम यांना तातडीने कामारेड्डीतील एका रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे आनंदाच्या वातावरणात दु:ख पसरले. बालचंद्रमयांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मुलीचे लग्न पाहण्याची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली.