spot_img
ब्रेकिंगमुलाच्या साक्षीने पित्याला लागली जन्मठेप; वाचा अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रकरण?

मुलाच्या साक्षीने पित्याला लागली जन्मठेप; वाचा अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रकरण?

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून पत्नीचा लाकडी दांड्याने निर्घृण खून करणाऱ्या पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपची शिक्षा सुनावली आहे. हा महत्त्वपूर्ण निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश सी. एम. बागल यांनी दिला. आरोपीचे नाव बाबासाहेब विठ्ठल गोलवड (वय ३८, रा. आंबी स्टोर, देवळाली प्रवरा, ता. राहुरी) असे आहे.

सदरची दुर्दैवी घटना १६ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली होती. आरोपीला दारूचे व्यसन होते, तर त्याची पत्नी मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होती. घटनेच्या दिवशी पैशांसाठी दोघांमध्ये वाद झाला. आरोपीने संतापाच्या भरात घरातील लाकडी दांडक्याने पत्नीच्या डोक्यावर व शरीरावर हल्ला केला. या हल्ल्यात ती जागीच ठार झाली.

धक्कादायक बाब म्हणजे, हा संपूर्ण क्रूर प्रसंग आरोपीचा मुलगा स्वप्निल गोलवड यांनी प्रत्यक्ष पाहिला होता. मुलांच्या ओरडण्यावर शेजारी जमले, परंतु आरोपी पळून गेला होता. याप्रकरणी मयत महिलेचा भाऊ विजय एकनाथ बर्डे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तपास एपीआय सचिन बागुल यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.

सरकारपक्षातर्फे अॅड. अनिल एम. घोडके यांनी युक्तिवाद केला. एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले, ज्यामध्ये प्रत्यक्षदर्शी मयत महिलेचा मुलगा स्वप्निल गोलवड, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद सायगावकर, आणि तपासी अधिकारी एपीआय सचिन बागुल यांची साक्ष निर्णायक ठरली. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून जन्मठेप तसेच १ हजार रुपये दंड ठोठावला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...

जैन मंदिर ट्रस्ट प्रकरण: धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी कोतवालीत तक्रार

जैन मंदिर ट्रस्ट प्रकरणी काळे, गुंदेचा यांनी दिली तक्रार अहिल्यानगर | नगर सह्याद्री श्री ऋषभ संभव...