spot_img
अहमदनगरकेडगावात विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला; नेमकं काय घडलं?

केडगावात विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला; नेमकं काय घडलं?

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :-
किरकोळ कारणावरून केडगाव परिसरात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर तिघा जणांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी एका हल्लेखोराची ओळख पटली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. जखमी विद्यार्थी निरंजन किशोर कार्ले (वय १९, रा. शाहूनगर, केडगाव) हा सोमवारी (दि. १३ ऑक्टोबर) रात्री टेम्पोने घराकडे जात असताना, मोतीनगर येथील एका डी.पी.जवळ लाल रंगाची पल्सर मोटारसायकल रस्त्यावर आडवी लावलेली दिसली.

निरंजनने तिथे उपस्थित असलेल्या इसमास गाडी बाजूला घेण्यास सांगितले. या विनंतीवरून संतापलेल्या इसमाने त्याला गाडीतून बाहेर ओढले आणि मारहाण सुरू केली. त्याचवेळी झाडीत लपलेले आणखी दोन जणही धावत आले आणि त्यांनीही पाईपने बेदम मारहाण केली.या हल्ल्यात निरंजनच्या कंबरेला, उजव्या पायाला आणि डाव्या हाताला गंभीर मार लागला असून, डाव्या पायाचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सध्या त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांपैकी एकाने निरंजनच्या पॅन्टच्या खिशात हात घालण्याचा प्रयत्न केला असता, त्याने प्रसंगावधान राखत त्याला धक्का दिला आणि घटनास्थळावरून पळ काढला. निरंजनने दिलेल्या जबाबानुसार कोतवाली पोलीस ठाण्यात मोईन उर्फ मोहन शेख व त्याचे दोन साथीदार (अनोळखी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे केडगाव परिसरात भीतीचं आणि अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू असून, लवकरच उर्वरित आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दिवाळीसाठी गावाकडे निघालेल्या बसला भीषण आग, २० जणांचा होपळून मृत्यू, 16 जण…

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - राजस्थानच्या जैसलमेरमध्ये मंगळवारी दुपारी भरधाव एसी बसला अचानक भीषण...

झेडपीसाठी मोठी अपडेट, 28 ऑक्टोबरला अंतिम…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री - जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीसाठी 1 जुलै...

आझाद ठुबे यांचा स्पेस कोण भरून काढणार?

जवळा जिल्हा परिषद गटात रस्सीखेच | सुजित झावरे, दीपक लंके, विश्वनाथ कोरडे, अशोक सावंत,...

मुंबईतील पक्ष बैठकीनंतर आमदार संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया

अहिल्यानगर | नगर सहयाद्री:- अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप...