spot_img
अहमदनगरभीषण अपघात; दोन युवक ठार, कुठे घडली घटना? वाचा..

भीषण अपघात; दोन युवक ठार, कुठे घडली घटना? वाचा..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील माहीजळगाव येथे भीषण अपघातात परांडा येथील दोन युवक सोमनाथ दत्तात्रय कदम (वय 24) व शिवाजी बबन कदम (वय 35 दोघेही रा. कोकरवाडी ता. परंडा जि. धाराशिव) हे ठार झाले आहे.

(मंगळवार) दिनांक 22 ऑक्टोबर रोजी सोमनाथ कदम व शिवाजी कदम हे दोघे कामानिमित्त कोकरवाडी (ता. परंडा) येथून करमाळा मार्गाने मोटारसायकलवरून (क्र. एम एच 45 आर 9718) मिरजगावच्या दिशेने येत असतांना अज्ञात वाहनाने समोरासमोर जोराची धडक दिली.

या अपघातात सोमनाथ दत्तात्रय कदम यांचा जागीच मृत्यू झाला. तर शिवाजी बबन कदम यांचा मिरजगाव येथील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे व मिरजगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दत्तात्रय कासार हे तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ शेतकऱ्याची शेळी खाल्ल्यानंतर वन विभागाची मोहीम यशस्वी सुपा / नगर...

वनविभागाच्या निष्क्रियता: पारनेर तालुक्यात बिबट्यांचा वाढता उपद्रव; कळस येथील घटनेने खडकवाडी येथील घटनेची आठवण!

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात मुळा नदीचा पट्टा व मुळा धरण...

आरास अन्‌‍… गर्दीच गर्दी…; बाप्पाच्या विसर्जनासाठी गणेशभक्त सज्ज, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‌‘डीजे‌’चा दणदणाट

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दरवर्षी प्रमाणे यंदाही लाडक्या गणरायाचे भव्य स्वागत डीजेच्या दणक्यात गणेश भक्तांनी...

झेडपीला महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच!

नगर तालुका पंचायत समितीसाठी आमदार शिवाजी कर्डिले विरुद्ध खा. नीलेश लंके, प्रा. शशिकांत गाडे...