spot_img
अहमदनगरनगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी

नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री:-
नगर-मनमाड राज्य मार्गावर हुंडाई कारचा भीषण अपघात झाला आहे. आज पहाटेच्या सुमारास येवला तालुक्यातील आंबेवाडी येथे घडलेल्या या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीरपणे जखमी झाला आहे. आकाश रमेश पवार आणि निलेश दगु शेवाळे अशी मयत तरुणांची नावे आहेत. तर चालक शुभम गंगाधर पानमळे गंभीरपणे जखमी झालेला आहे.

हुंडाई कारला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली, ज्यामुळे कार सुमारे 30 ते 40 फूट लांब रस्त्याच्या कडेला फेकली गेली. अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. चालक आपल्या मित्राला मनमाड रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी जात असताना अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमीला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलीस पुढील तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगरात रक्तरंजित हल्ला! सख्या भावंडांवर सपासप वार

अहिल्यानगर | नगर सहयाद्री:- केडगाव परिसरात एका किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून कोयत्याने जीवघेणा हल्ला...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींवर महालक्ष्मीची कृपा होणार, दुप्पट नफा मिळणार ! जाणून घ्या तुमचा आजचा दिवस!

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य प्रेमानेच प्रेम वाढते हे कायम लक्षात ठेवा. थोड्या...

पारनेरमध्ये खासदार लंके गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

  पारनेर / नगर सह्याद्री- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस...

‘साकळाई’ची प्रशासकीय मान्यता घेऊन तात्काळ भूमिपूजन, प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी

साकळाई योजना कृती समितीची बैठक हिवरे झरे येथे संपन्न सुनील चोभे / नगर सह्याद्री- नगर तालुक्यातील...