spot_img
अहमदनगरनगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात! चार महिला ठार

नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात! चार महिला ठार

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री:-
नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. रविवारी सकाळी सव्वा आठ वाजता लक्झरी बस आणि कारचा भीषण अपघात पिंपळगाव जोगा येथे झाला. या अपघातात चार’ महिलांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहे.

भाग्यश्री साहेबराव गायकर (वय १८, रा. कळंब, ता. अकोले, जि. अ. नगर) व कुसूम मारुती शिंगोटे (वय ५५, ता. बदगी बेलापूर, ता. अकोले, जि. अ. नगर), सविता साहेबराव गायकर (सर्व रा. कळंब) व सुनिता कारभारी हाडवळे (रा. लिंगदेव, ता. अकोले, जि. अ. नगर) अशी मयत महिलांची नावे आहे.

रविवार दि. ४ ऑगस्ट रोजी सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास आळेफाट्यावरून कल्याणच्या दिशेने जाणार्‍या बसची समोरून येणार्‍या कारला समोरासमोर धडक झाली. धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरश: चुराडा झाला. बस आणि कार रस्त्याच्या बाहेर जाऊन पलटी झाल्या. क्रेनच्या सहाय्याने कार आणि बसला बाहेर काढण्यात आले आहे.

या अपघातात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर वाहन चालक साहिल साहेबराव गायकर, साहेबराव रामदास गायकर, असे दोघे जखमी झाले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...

निघोज नगरीत अवतरली पंढरी!, बाल वारकऱ्यांचा विठ्ठल नामाचा गजर

निघोज । नगर सहयाद्री आषाढी एकादशीचे औचित्य साधून महाराष्ट्रीय संस्कृतीचे जतन व दर्शन घडावे...

तारकपूर परिसरात घडलं भयंकर!,अपघातात वृद्ध महिलेचा मृत्यु

अहिल्यानगर। नगर सहयाद्री शहरातील तारकपूर परिसरात शुक्रवारी (ता. 4) मध्यरात्री दुचाकीला ट्रकने धडक दिली. या...