Accidents News: मनमाड महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. आज पहाटेच्या दरम्यान दोन वाहनांची समोरासमो धडक झाली. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
अधिक माहिती अशी: नांदगाव-मनमाड महामार्गावर हिरेनगर फाट्यावर अपघाताची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
आशा शिवाजी देशमुख (५५), विकास शिवाजी देशमुख (३५) दोघे ( रा.मोहाडी ) नारायण सुखदेव महाजन (७०), गराबाई देशमुख (६०) रा. मोहाडी अशी जखमींची नावे आहेत. तर अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे अद्याप स्पष्ट झालेली नाही/
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत स्थानिकांच्या मदतीने जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातामध्ये दोन्ही गाड्यांचा अक्षरशः चुराडा झाला आहे.