spot_img
अहमदनगरसह्याद्री ब्रेकिंग...: नगर कल्याण महामार्गावर अपघात, सहा जण ठार, पारनेरचे तीन तर...

सह्याद्री ब्रेकिंग…: नगर कल्याण महामार्गावर अपघात, सहा जण ठार, पारनेरचे तीन तर संगमनेरचे..

spot_img

पारनेर/ नगर सह्याद्री-

कल्याण-नगर महामार्गावर ढवळपुरी फाट्याजवळील भनगडेवाडी शिवारात एसटी बस, कार आणि ट्रॅटर या तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. बुधवारी (दि. २४) पहाटे २.३० वाजता झालेल्या या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोघे पारनेर, तिघे संगमनेर आणि एक पाथर्डी तालुयातील आहेत.

नीलेश रावसाहेब भोर (वय २५, रा. देसवडे, ता. पारनेर), जयवंत रामभाऊ पारधी (वय ४५), संतोष लक्ष्मण पारधी (वय ३५), अशोक चिमा केदार (वय ३५, तिघे रा. जांबुत ता. संगमनेर), प्रकाश रावसाहेब थोरात (वय २४ रा. वारणवाड़ी ता. पारनेर), सचिन कांतीलाल मंडलेचा (वय ४०, रा. टाकळीमानूर, ता. पाथर्डी) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. सुयोग अंबादास आडसुळ (वय २५ रा. भनगडवाडी ता. पारनेर ), देवेंद्र गणपत वाडेकर (वय २७, रा. देसवडे ता. पारनेर), बद्रीनाथ विठ्ठल जगताप (वय ४५ ग्रामसेवक रा. लोणी, ता. शिरुर कासार, जि. बीड) यांचा जखमीमध्ये समावेश आहे.

 

महामार्गावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅटर व ठाणे-मेहकर बस आणि इको गाडी यांची ढवळपुरी फाटयाजवळ जोरदार टक्कर झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, तिन्ही वाहनांचा अक्षरश: चुराडा झाला. या दुर्घटनेत सहा जण ठार झाले. मृतांची संख्या वाढण्याची शयता व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती परिसरात पसरताच पोलिसांसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केले.

अपघातातील जखमींना प्राथामिक उपचारासाठी पारनेर येथील रुग्णालयात आणले तर काहींना नगर येथे हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. यासंबंधी गुन्हा दाखल करण्याचे काम पारनेर पोलीस ठाण्यात दुपारपर्यंत सुरू होते.

उत्तरप्रदेशमध्येही अपघातात चार ठार

फेरफटका मारून परतत असताना दाट धुक्यामुळे पुढचं काही नीट न दिसल्याने कार रामगंगा नदीवर बांधलेल्या बॅरेजचे रेलिंग तोडून खाली कोसळली. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण बचावला आहे. ही घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. धुक्यामुळे नीट दिसत नव्हतं आणि वेगाने जाणारी ती कार नियंत्रणाबाहेर गेला आणि पाण्यात पडली. कारच्या खिडक्या उघडता न आल्याने आत बसलेल्या चार तरूणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पण कारमधील एक तरूण कसाबसा काच फोडून बाहेर आला होता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आजचे राशी भविष्य ! ‘या’ राशीतील जातकांना लाभदायक ‘गुरुवार’

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य खूप अल्पसे अडथळे येतील-परंतु दिवसभरात खूप काही यश...

नगर शहरातील तीन समाजकंटक हद्दपार; वाचा नगर क्राईम

​अहिल्यानगर । नगर सह्याद्री ​अहिल्यानगर शहरात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कोतवाली...

जिल्हा बँक सोनेतारण व्यवसाय वाढवणार : चेअरमन चंद्रशेखर घुले

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोनेतारण व्यवसायात वाढ करणार...

सामूहिक आत्महत्येने नाशिक हादरले, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने २ मुलांसह विहिरीत मारली उडी

नाशिक / नगर सह्याद्री - नाशिकमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन मुलांसह सामूहिक आत्महत्या केल्याची घटना...