महामार्ग ग्रामस्थांनी रोखला | अधिकार्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
आळेफाटा | नगर सह्याद्री
भरधाव वेगाने चालेल्या ट्रकने अंत्यविधीवरुन परतणार्या लोकांने चिरडले. नगर-कल्याण महामार्गावरील आळेफाटा परिसरातील गुळंचवाडी शिवारात हा भीषण अपघात झाला. यात घटनेत चार जणांचा जागीच दुर्दवी मृत्यू झाला असून १० ते १५ जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे. यातील जखमींवर आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. दरम्यान ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत रास्तारोको करत महामार्ग अडवून धरला असून महामार्ग प्राधिकरणांच्या अधिकार्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान ट्रकचा चालक पळून जात असताना त्याला ग्रामस्थांनी पकडले असून त्यांला पोलिसांच्या ताब्यात दिले.
आळेफाटा परिसरातील गुळुंचवाडी शिवारात आज शुक्रवारी (दि.१९) सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारस गावातील मयत भांबीरे यांच्या कुटूंबातील लोक यांचा अंत्यविधी करून गावातील अनेक ग्रामस्थ नातेवाईक कल्याण-नगर रोडने जात होते. त्यावेळी नगरवरूनबेल्हे बाजूकडे येणार्या १२ टायर ट्रकने रोडवरून पायी चालणार्यांना चिरडले. यात १ महिला, २ पुरुष, १ लहान मुलगायासह इतर लोकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर ट्रक चालकांला ग्रामस्थांनी पकडले. योगेश नारायण दाते, (रा.आणे) एक लहान बाळ, दत्तात्रय लक्ष्मण गोसावी, नंदराम भांबरे यांच्यासह इतर काही जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान ट्रकचा चालक पळून जात असताना त्याला ग्रामस्थांनी पकडले. ग्रामस्थांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. तसेच रस्त्यावर असलेल्या जमावाने ट्रकची तोडफोड केली. तसेच ग्रामस्थांनी तातडीने जखमींना उपचारांसाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
अपघातानंतर ग्रामस्थांनी रोखला महामार्ग
भीषण अपघातात चौघांचा बळी गेला तर अनेक जण जखमी आहेत. या घटनेने संपूर्ण गावांवर शोककळा पसरली आहे. महामार्ग गावातून नेता तो तातडीने बायपास करण्याची मागणी करूनही गुळंचवाडी गावावातून महामार्ग गेल्याने अपघात होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला. सुमारे अडीच तास ग्रामस्थांनी हा महामार्ग अडवून धरला. जो पर्यंत महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा अशी आक्रमक भूमिका घेतली. यामुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर यांच्यासह पोलिस पथक दाखल झाले होते.