spot_img
ब्रेकिंग१ एप्रिलपासून FASTag अनिवार्य; अन्यथा दुप्पट टोल भरावा लागणार, काय आहेत नियम

१ एप्रिलपासून FASTag अनिवार्य; अन्यथा दुप्पट टोल भरावा लागणार, काय आहेत नियम

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री :
महाराष्ट्र शासनाने फास्टॅगसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.आता १ एप्रिलपासून प्रत्येक टोल नाक्यावर फास्टॅग अनिवार्य असणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक कारला फास्टटॅग लावणे अनिवार्य आहे. जर तुम्ही कॅश, कार्ड किंवा यूपीआयद्वारे टोल भरला तर तुम्हाला टोलचे डबल पैसे भरावे लागणार आहे.

एमएसआरडीसीने याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी परिपत्रक जारी करत फास्टॅग (Fastag)असणे अनिवार्य असल्याचे सांगितले आहे. यामुळे टोल घेण्याची प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे. तसेच टोल भरण्यासाठी जास्त वेळ रांगेत उभे राहावे लागणार आहे. भारतीय राष्ट्रीय प्राधिकरण विभागाने दिलेल्या निर्देषानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

एमएसआरडी मुंबईतील पाच टोल प्लाझाला ऑपरेट करते. यामध्ये दहीसर टोल नाका (Dahisar Toll Plaza), मुलुंड पश्चिम (Mulund West), मुलुंड पूर्व (Mulund East), ऐरोली (Airoli toll plaza) आणि वाशी (Vashi Toll Plaza) या टोल नाक्यांचा समावेश आहे. यामधून काही राज्य सरकारच्या बस किंवा शालेय बसला टोल भरण्यापासून सूट दिली जाईल.

याचसोबत वांद्रा-वरळी सी लिंक (Bandra Worli Sea Link), मुंबई-पुणे एक्सप्रेसवे (Mumbai-Pune Exapress Way), जुना मुंबई-पुणे हायवे, मुंबई नागपूर समुद्धी एक्सप्रेस वे, नागपूर इंटीग्रेटेड रोड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, सोलापूर इंटीग्रेटेड रोड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, छत्रपती संभाजी नगर इंटीग्रेटेड रोड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, काटोल बायपास या सर्व टोल नाक्यांवर तुम्हाला फास्टटॅग पद्धतीने टोल भरावा लागणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने १६ फेब्रुवारी २०२१ पासूनच फास्टॅग अनिवार्य केले होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जवळपास ४५,००० किलोमीटरच्या महामार्ग आणि एक्सप्रेस वेसाठी टोल वसूल करते. १००० टोल प्लाझा आहेत. फास्टॅगमुळे टोल भरण्याचा कालावधीदेखील कमी झाला आहे. फक्त ४७ सेकंदात तुम्ही टोल भरु शकता.

यासंदर्भात पुण्यातील एका नागरिकाने पीआयएल फाइल केले होते. अर्जुन खानपूरे यांनी कोर्टात PIL फाइल केले होते. ज्यामध्ये महामार्गावर कमीत कमी १ लेन ही हायब्रिड ठेवावी. जेणेकरुन कॅश किंवा इतर कोणत्याही माध्यमातून तुम्ही टोल भरु शकतात. याबाबत त्यांचे वकील उदय वारुंजिकर यांनी सांगितले होते की, काही लोक आहे जे तंत्रज्ञानाशी जास्त जोडले गेले नाही. त्यामुळे त्यांच्याकडून जर फास्टॅग नसेल तर डबल टोल जमा करणे हे बेकायदेशीर आहे. परंतु न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला आहे. फास्टटॅग वापरण्यासाठी जास्त तंत्रज्ञान माहित असण्याची गरज नाही, असं म्हटलं होतं.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...