spot_img
अहमदनगरद्राक्ष मंडप कोसळून शेतकर्‍याचे मोठे नुकसान; पारगाव सुद्रिक येथील घटना; शेतकरी वर्गातून...

द्राक्ष मंडप कोसळून शेतकर्‍याचे मोठे नुकसान; पारगाव सुद्रिक येथील घटना; शेतकरी वर्गातून हळहळ

spot_img

श्रीगोंदा | नगर सह्याद्री

श्रीगोंदा तालुयातील पारगाव सुद्रिक येथील प्रगतिशील युवा शेतकरी सुनील बबन जगताप यांच्या द्राक्षबागेतील मंडप कोसळून सुमारे ४५ ते ५० लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी दि. १३ एप्रिल रोजी सकाळी साडे आठच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

जगताप यांची पारगाव-लोणी व्यंकनाथ रोडलगत गट क्रमांक ३५५ मध्ये सुमारे तीन एकर क्षेत्रावर माणिक चमन’ या संकरित वाणाची द्राक्ष बाग आहे. १२ ते १५ दिवसांत द्राक्ष काढणीस येणार असताना बागेवर सुमारे ८० ते ९० टन द्राक्षांचा बोजा होता. वजनाचा ताण न सहन झाल्याने मंडपाचे अँगल वाकून संपूर्ण बाग जमीनदोस्त झाली. या घटनेत संपूर्ण बागेचे मोठे नुकसान झाले असून, त्याची अंदाजे किंमत ४५ ते ५० लाख रुपये इतकी आहे.

घटनेची माहिती मिळताच गावातील शेतकरी बांधवांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व नुकसान पाहून हळहळ व्यक्त केली. पंचनामा करून शासनाने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.सुनील बबन जगताप हे सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब महादू जगताप यांचे पुतणे असून, आधुनिक शेतीत ते आघाडीवर आहेत. पारगाव सुद्रिक हे आधुनिक शेतीसाठी ओळखले जाते आणि सुनील जगताप यांनी आपली द्राक्ष बाग आधुनिक पद्धतीने विकसित केली होती. मात्र एका क्षणात उद्भवलेल्या या दुर्घटनेने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

​महापालिका निवडणूक: मतदार यादीचा ‘मुहूर्त’ पुन्हा लांबणीवर

​महापालिका निवडणूक: मतदार यादीचा ‘मुहूर्त’ पुन्हा लांबणीवर आता २० नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी ​दुबार नावांचा...

डॉ. बोरगेंच्या अडचणी कायम ; साडेसोळा लाखांच्या अपहार प्रकरणी अधिक तपासाचे आदेश

डॉ. बोरगेंच्या अडचणी कायम ; साडेसोळा लाखांच्या अपहार प्रकरणी अधिक तपासाचे आदेश ९ फेब्रुवारीपर्यंत अहवाल...

अण्णासाहेब पाटील महामंडळात बोगस लाभार्थी; असे आले उघडकीस…

​बनावट कागदपत्रांद्वारे शासनाचा व्याज परतावा लाटला; दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - मराठा...

बिहार तो झांकी है, अहिल्यानगर अभी बाकी है!

मिलिंद गंधे / शहर भाजपच्या वतीने बिहारच्या निवडणूक विजयाचा जल्लोष अहिल्यानगर / नगर सह्याद्री - बिहार...