spot_img
अहमदनगरशेतकऱ्यांचा प्रश्न विधानभेत गाजला; आमदार सत्यजीत तांबेंची मोठी मागणी

शेतकऱ्यांचा प्रश्न विधानभेत गाजला; आमदार सत्यजीत तांबेंची मोठी मागणी

spot_img

संगमनेर । नगर सहयाद्री:-
राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४’ ही योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांना मोफत वीज दिली जाते. मात्र, सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेत या योजनेच्या निकषांमध्ये बदल करून १५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांनाही मोफत वीज देण्याची मागणी केली आहे.

राज्यातील ५०% पेक्षा जास्त शेतकरी हे ७.५ हॉर्स पॉवर पेक्षा जास्त क्षमतेचे शेतीपंप वापरणारे आहेत. या शेतकऱ्यांना देखील मोफत वीज मिळावी यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४’ च्या निकषात बदल करून १५ अश्वशक्ती करणे आवश्यक असल्याचे आ. तांबे यांनी सांगितले. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंप वापरणाऱ्यांना शेतकऱ्यांना वीज मोफत दिली जाते.

राज्यातील ४४ लाख ३ हजार शेतकऱ्यांच्या ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाते. ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम शेती क्षेत्रावर झाल्यानं त्याचा फटका शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. विविध संकटामुळं अडचणीत सापडलेल्या शेती पंप ग्राहकांना मोफत वीज देण्यासाठी “मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-२०२४” राबवली जाते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माजी मंत्री थोरातांनी धाडलं थेट मंत्री विखे पाटलांना पत्र, कारण की…!

संगमनेर । नगर सहयाद्री:- भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा मे-जून महिन्यांपासून समाधानकारक...

पारनेरमधील अपघातावर आमदार धस यांची प्रतिक्रिया; मुलाला व्यसन नाही, तो….

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस यांच्या कारने सोमवारी...

माजी नगरसेवक अमोल येवलेसह 12 जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- केडगाव येथील 132 केव्ही महावितरण उपकेंद्रात शासकीय कामकाजादरम्यान अतिरिक्त कार्यकारी अभियंता...

मुख्यालयातील पोलीस अंमलदार झाले बेपत्ता

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार बेपत्ता झाले आहेत....