spot_img
ब्रेकिंगशेतकऱ्यांनो कामं उरकून घ्या, मुंबईला जायचं, मनोज जरांगेंची मोठी घोषणा

शेतकऱ्यांनो कामं उरकून घ्या, मुंबईला जायचं, मनोज जरांगेंची मोठी घोषणा

spot_img

बीड / नगर सह्याद्री :
मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार उपसलं आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी माध्यमांशी बोलताना पुढच्या आमरण उपोषणाची तारीख जाहीर केली आहे. 29 ऑगस्टला मुंबई धडक देऊन आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचामनोज जरांगे-पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितला आहे. आज माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, सरकारकडं मराठा बांधवांनी समजून घ्या कारणच नाही येत आता आपल्याला त्यामुळे मुंबई सोडायचा आता प्रश्न येत नाही, आंदोलनाची पुढील टप्प्याची रूपरेषा काय असेल ती आज मात्र सांगत नाही. मुद्दाम सांगत नाही आणि समाजाला माहिती मी जे पाऊल उचलेल ते तुमच्या हिताचा उचलतो. योग्य वेळी सांगितल्यावर तुम्हाला तेवढा एक महिन्याचा परत वेळ राहतोय. 28 ऑगस्टला मी उपोषण करणार तुम्ही सगळ्यांनी फक्त मला सोडायला आले तरी बास असंही पुढे मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

दोन वर्षे झाले तरीही आम्ही संयमाने घेत आहोत.मागील उपोषण सोडताना चार मागण्या तात्काळ अंमलबजावणी केले जाईल असे सांगितलं होतं. आज तीन महिने पूर्ण झाले, कुठल्याही मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही. मला समाजाच्या लेकराच्या अडीअडचणी बघाव्या लागतात, संयम तरी किती दिवस धरायचा. 29 ऑगस्ट 2025 ला आम्ही मुंबईत जाणार आहे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. हे मुंबईत गेल्याशिवाय पर्याय निघत नाही हे आमच्या लक्षात आलं आहे. मुंबईत आमरण उपोषण सुद्धा होणार आहे. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आपल्याला त्या ताकतीने उठाव करावा लागणार आहे. सगळ्या मराठा बांधवांनी 29 ऑगस्टच्या अगोदर काम आवरून ठेवा. आता माघारी यायचं नाही, सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेला दीड वर्ष पूर्ण झाला आहे. पुढील आंदोलनाची दिशा एक ऑगस्ट रोजी सांगणार आहे.सरकारने आपली शंभर टक्के फसवणूक केली, असंही पुढे मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले, हक्काचा आहे ते आम्हाला द्या. कोणी विरोध केला तरी ते आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला द्या ते रोखू नका असं आवाहन देखील त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना केलं आहे. आझाद मैदानावरती किंवा मंत्रालयाच्या समोर मी आमरण उपोषण करणार आहे, या दोन ठिकाणावरती उपोषण करणार आहे. शांततेत उपोषण केल्याशिवाय माझ्या समाजाला न्याय मिळणार नाही. समाजाला सांगतो तुम्ही रुसू नका. मी उपोषण केलं की, तुम्ही रुसता. तुम्ही रुसायचं नाही तुम्ही ताकतीने माझ्यासोबत आलं पाहिजे. तुमच्या मुलांसाठी मी हे करतोय. आपल्या लेकरा बाळांचं चांगलं झालं पाहिजे. कडवट वागायचं, धाडसी वागायचं असंही पुढे मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. एक ऑगस्टला आंदोलनाची पुढील दिशा आणि मार्ग सांगणार आहोत. आजपासून तयारी सुरू करण्यात आलेली आहे. चलो मुंबई मला फक्त 28 तारखेला मुंबईत नेऊन सोडा. ज्यांना शक्य आहे त्यांनीच मला सोडायला या मी खंबीर आहे तुमच्या लेकरा बाळांसाठी लढायला. माझा समाज माझ्या मागे आहे. सात कोटी मराठा माझ्यासोबत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा इशारा
मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा इशारा दिला आहे. फडणवीस साहेब सत्ता जात असते, माणसाच्या डोक्यात एकदा खुन्नस बसली तर सत्ता बदलल्यावर लोक बदले घेत असतात. फडणवीस खुनशीपणाने वागू नका, गर्वात राहू नका. 40 ते 50 वर्षाची काँग्रेसची सत्ता गेली तुमची पण जाईल. फडणवीस साहेब डोक्यात खुन्नस बसली सत्ता बदलल्यावर बदले घेत असतात.आमच्याशी खुनशीपणाने आणि आकसाने वागू नका. तुम्हाला स्वप्नात वाटलं नव्हतं, काँग्रेसची सत्ता पलटेल, काँग्रेसने 40 ते 50 वर्ष राज्य केलं. तुमची आली तसं तुमची सुद्धा पलटत असते, गर्वात वागू नका. तुम्ही गॅझेटीयर, केसेस आणि मराठा आणि कुणबी एक आहेत याचे अध्यादेश तातडीने काढा. नोंदी सापडलेले प्रमाणपत्र तातडीने द्यायला सुरुवात करा, असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...