spot_img
ब्रेकिंगशेतकर्‍यांनो पेरणीची घाई करु नका ; कृषी विभागाने दिला रेड सिग्नल, काय...

शेतकर्‍यांनो पेरणीची घाई करु नका ; कृषी विभागाने दिला रेड सिग्नल, काय म्हणाले पहा

spot_img

आता निघणार घाम | १२ जूनपासून मान्सून सक्रीय होणार

मुंबई | नगर सह्याद्री

देशातील शेती आणि शेतकरी आजही पावसावर अवलंबून आहे. सिंचनाची सोय नसल्याने कास्तकार या दुष्टचक्राच्या कचाट्यात दरवर्षी भरडल्या जातो. शेती जून ते सप्टेंबर या काळात पडणार्‍या पावसावर अवलंबून आहे. या तीन महिन्यातील पावसावरच शेतकीचा खटाटोप करावा लागतो. पूर्व मान्सून, अवकाळीने मे महिन्याचा संदर्भ बदलून टाकला. पण मान्सूनची गती मंदावली. त्यामुळे जून महिन्यात उष्णतेचा, दमटपणाचा कहर दिसून येत आहे. हवामान खात्यानुसार, अजून ९ दिवस अंगाची लाही लाही होईल. १६ वर्षानंतर मान्सून त्याच्या नियोजीत वेळेपूर्वी आला. पण आता त्याने थोडा ब्रेक घेतला आहे. तो ११-१२ जून रोजी पु्न्हा सक्रिय होण्याची दाट अंदाज आहे.

४ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था असलेल्या भारताची लाईफलाईन मान्सूनच आहे. मान्सून देशाचा ७० टक्के भूभाग व्यापतो. पीकांना, गुरढोरांना, मनुष्याला आणि इतर अनेक घटकांना जीवन’ देतो. त्यांना नवनिर्मितीची आस देतो. सध्या देशात धरण, तलाव आणि नदी, विहिरी, इंधनविहिरी हे पाण्याचे प्रमुख स्त्रोत आहेत. जून ते सप्टेंबर या काळात पडणार्‍या पाण्यावरच देशाची शेती अवलंबून आहे.पुणे वेधशाळेनुसार, हवामान खात्यानुसार, मान्सूनची गती गेल्या काही दिवसात मंदावली आहे. यामध्ये ११-१२ जून दरम्यान तेजी येईल. उर्वरीत भाग लवकरच मान्सूनमय होईल. पावसाचे आगमन होईल. शेतीच्या कामांना गती येईल. २४ मे रोजी मान्सून केरळ मार्गाने राज्यात लवकर दाखल झाला होता. देशाच्या दक्षिण, उत्तर पश्चिम आणि पश्चिम भागात त्याने हजेरी लावली. पण त्याचा उत्साह टिकला नाही. त्याची गती मंदावली. हवामान खात्यानुसार, पश्चिम बंगालमधून मान्सूनला अजून बळ मिळेल. लवकरच देशभरात मान्सून सक्रिय होईल.

पाऊस थांबल्याने
शेतीची कामे खोळंबली
हवामान खात्यानुसार, ११ जून रोजीच्या जवळपास बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठीचे अनुकूल वातावरण तयार होईल. त्यामुळे देशाच्या उत्तरी भागात पावसाचे आगमन होईल. केरळमध्ये १ जूनपासून मान्सून सक्रिय होऊन तो देशभर प्रवास करतो. त्यामुळे शेतीच्या कामाला वेग येतो. सध्या पावसाने हात दाखवल्याने शेतीची कामे खोळंबली आहे. शेतकर्‍यांनी जोरदार पावसाची प्रतिक्षा करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. नाहीतर दुबार पेरणीच्या कचाट्यात शेतकरी सापडू शकतो.

७ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट
महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शयता आहे, तर उर्वरित भागात कडक ऊन आणि उकाड्याचा त्रास वाढला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पुढील तीन ते चार तास रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वादळी वार्‍यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मॉन्सूनने यंदा विक्रमी वेगाने महाराष्ट्रात प्रवेश केला, परंतु गेल्या पाच दिवसांपासून अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मॉन्सूनची वाटचाल थांबली आहे. मुंबई, ठाणे, कल्याणसह अहिल्यानगर, अदिलाबाद, पुरी आणि बालूरघाटपर्यंत मॉन्सूनची सीमा स्थिर आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (ता. ३) जोरदार पावसाची शयता आहे, तर विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत वादळी वार्‍यांसह पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलका पाऊस पडण्याची शयता हवामान विभागाने वर्तवली आहे.

 

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रकार! एका कारणामुळं शिक्षिकेची पदोन्नती रद्द; नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका महिला...

पारनेर तालुक्यात पिकांचा बनावट पंचनामा; सखोल चौकशीची मागणी

पिंपरी पठार, वेसदऱ्यात लाभार्थ्यांची बोगस यादी: सरपंच शिंदे पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील पिंपरी...

राज-उद्धव ठाकरेंच्या युतीचं अखेर ठरलं, जागावाटपाबाबत मोठी माहिती समोर!

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मनसेचे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात...

सरपंच संजय रोकडे यांची आक्रमक भूमिका; ग्रामस्थांसह ‘या’ कामांसाठी करणार उपोषण..

पारनेर । नगर सहयाद्री:- वडगाव सावताळ ते गाजदिपूर या गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी...