नगर सहयाद्री टीम-
तंत्रज्ञानाच्या आगमनाने जीवन खूप सोपे झाले आहे. प्रत्येक कामात आता इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. पण, इंटरनेटच्या अतिवापरामुळे फसवणूकीचेव प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे गेल्या काही काळात पाहायला मिळत आहे.
आपली कुसुम सोलर योजनेअंर्तगत निवड झाली असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वयंसर्वेक्षण करण्याच्या सूचना भ्रमणध्वनीवर येत आहे. हे स्वयंसर्वेक्षण करताना सिंचन सुविधेसह शेतकऱ्याचा फोटो, सिंचन व्यवस्थेचा फोटो व शेतीचा फोटो अपलोड करण्यास सांगितले जाते.
ते पूर्ण झाल्यानंतर भरणा करण्यास सांगितला जातो. परंतु हे येणारे बहुतांश संदेश चुकीचे असून शेतकऱ्यानी संबंधित विभागाशी संपर्क केल्याशिवाय कोणताही ऑनलाईन अथवा रोख व्यबहार करू नये नाहीतर मोठा आर्थिक भुर्दड सोसावा लागू शकतो.
शेतकऱ्यांनी भ्रमणध्वनीवर आलेले संदेश अथवा कॉलची संबंधित विभागाशी संपर्क करुन शहानिशा केल्याशिवाय किंवा कुसुम सोलर योजनेअंतर्गत निवड झाल्याचा संदेश किवा फोन आला तर संबंधित विभागाशी संपर्क केल्याशिवाय कागदपत्रे अथवा इतर माहिती देऊ नये.