spot_img
अहमदनगरएमआयडीसीत बाप्पाला निरोप; पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात रंगली विसर्जन मिरवणुक

एमआयडीसीत बाप्पाला निरोप; पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात रंगली विसर्जन मिरवणुक

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
एमआयडीसी परिसरात गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेला गणेशोत्सव मंगलमय वातावरणात पार पडला. स्वराज्य कामगार संघटनेच्या पुढाकाराने एक्साईड कंपनीत स्थापन करण्यात आलेल्या श्री गणेशाची विसर्जन मिरवणूक मंगळवारी (दि.2 सप्टेंबर) पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषमय वातावरणात काढण्यात आली. कामगारांनी उत्साहात ठेका धरत गणरायाला निरोप दिला. विशेष म्हणजे या मिरवणुकीत सर्व धर्मीय कामगार एकत्र येत धार्मिक सौहार्दाचे आणि एकात्मतेचे दर्शन घडविले.

गणेशोत्सवाच्या सात दिवसांत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सत्यनारायण महापूजेनंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात महिला वर्गाने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत सोहळ्याची शोभा वाढविली.
गणेश विसर्जन सोहळ्यास कंपनीचे प्लांट हेड संदीप मुनोत, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख योगेश गलांडे, स्वराज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष दत्ता तापकिरे, सौ. हेमा शेळके, मनीषा झावरे, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद परदेशी, पो.कॉ. उमेश शेरकर, पो.कॉ. सचिन हरदास यांच्यासह कंपनीतील सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मिरवणुकीदरम्यान गणेश भक्तांनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! अशा घोषणा देत वातावरण दुमदुमविले. पारंपारिक ढोल-ताशांच्या निनादात, गुलालाच्या उधळणीत व गाण्यांच्या तालावर कामगारांनी ठेका धरला. अभिजित सांबारे, रमेश शिंदे, स्वप्नील खराडे, संतोष शेवाळे, अजिनाथ शिरसाठ, राहुल जगधने, वसीम शेख, फिरोज शेख, सचिन खेसे, किसन तरटे, रमेश देशमुख, दिपक परभाणे, सोमनाथ शिंदे, अमोल ठोकळ, भरत दिंडे, सोमनाथ बारबोले, गणेश ठोंबरे, शाम घुगरकर, पोपट जगताप, जितेंद्र तळेकर, शशिकांत संसारे, राम घुगे, अनिल गायकवाड, सतीश गर्कल, शरद थोरात, कृष्णा सत्रे, प्रवीण शिंदे, निलेश हसानळे, धनंजय राऊत, भास्कर गव्हाणे, नामदेव झेंडे, संतोष खोटे, प्रदीप दहातोंडे आदींसह शेकडो कामगारांनी मिरवणुकीत उत्साहात सहभाग नोंदविला.

मोठ्या जल्लोषात पार पडलेल्या मिरवणुकीनंतर गणरायाचे विळद घाट येथील तलावात विसर्जन करण्यात आले. बाप्पाला निरोप देताना कामगारांच्या डोळ्यांत भावुकता तर ओठांवर पुढच्या वर्षी लवकर या! चा गजर होता. तसेच यावेळी आमटी-भाकर या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. 3 हजार कामगारांनी याचा लाभ घेतला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कचरा गाड्यांच्या माध्यमातून करदात्यांची लूट ; नगरसेवक योगीराज गाडे काय म्हणाले पहा

अहिल्यानगर । नगर सह्याद्री महापालिका व आयुक्त यशवंत डांगे जनतेची दिशाभूल करत असून नव्या कचरा...

आयुक्त डांगेंच्या नियुक्ती चौकशीचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, नेमकं प्रकरण काय पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे यांच्या नियुक्तीवर...

धक्कादायक ! डॉक्टर महिलेच्या मृत्यूचा PM रिपोर्ट आला पण…’या’ प्रश्नांचं गूढ अद्याप कायम

सातारा / नगर सह्याद्री - सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील एका सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या युवा...

बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम; पारनेरचे भूमिपुत्र आंदोलनात दाखल

पारनेर / नगर सह्याद्री - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी...