मुंबई / नगर सह्याद्री : सिनेइंडस्ट्रीमधून एक मोठी बातमी आली आहे. सिनेरसिकांसाठी धक्का येणारी ही बातमी आहे. तमिळ अभिनेते डॅनियल बालाजी यांचे वयाच्या ४८ व्या वर्षी निधन झाले आहे.
डॅनियल बालाजी यांचे शुक्रवारी हृदयविकाराने निधन झाले. अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अगदी कमी वयात अभिनेत्याचे निधन झाल्यामुळे भारतीय सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
डॅनियल बालाजी यांच्या छातीमध्ये दुखू लागल्याने लगेचच त्यांना चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अभिनेत्याला डॉक्टरांकडून वाचवण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र सर्व त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. अभिनेत्याच्या एक्झिटने फक्त चाहत्यांवरच नाही तर, त्यांच्या कुटुंबीयांवर आणि सेलिब्रिटी मित्रांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
डॅनियल यांच्या पार्थिवावर आज (३० मार्च) चेन्नईतल्या पुरसाईवलकममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. डॅनियल बालाजीने आपल्या सिनेकरिअरची सुरुवात कमल हसन यांच्या Marudhanayagam या चित्रपटातून केली होती, पण त्यांचा तो चित्रपट कधीच रिलीज झाला नाही. यानंतर डॅनियल टिव्ही क्षेत्राकडे वळाले. ‘चिट्ठी’ मालिकेमुळे डॅनियलला चाहत्यांमध्ये प्रसिद्धी मिळाली.