spot_img
अहमदनगरनामी शक्कल! मक्याच्या पिकात अफूची शेती; 'असा' अडकला जाळ्यात

नामी शक्कल! मक्याच्या पिकात अफूची शेती; ‘असा’ अडकला जाळ्यात

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
शेतकर्‍याने शेतात ज्वारी आणि मका पिकाच्या मध्यभागी 30 बाय 30 फुट जागेत अफूची लागवड केल्याचा प्रकार नगर तालुका पोलिसांनी तालुक्यातील सारोळा कासार शिवारात 7 मार्च रोजी सायंकाळी उघडकीस आणला आहे. पोलिसांनी शेतात लागवड केलेली 4 लाख 27 हजार 500 रुपये किंमतीची अफूची 4275 लहान-मोठी झाडे जप्त केली आहे.

नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते यांना गोपनीय माहिती मिळाली की, सारोळा कासार शिवारात खडकी रोड ते दरेमळा जाणार्‍या रोडवर असलेल्या शेतात शेतकर्‍याने महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या अफूची (खसखस) लागवड केलेली आहे. ही माहिती मिळताच सहायक गिते यांनी नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक संपतराव भोसले यांना संपर्क करून माहिती सांगितली.

भोसले यांनी छापा टाकून कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानंतर 7 मार्चला गिते यांच्यासह हवालदार एस.व्ही. खरात, राहुल द्वारके, महिला एम.एन. काळे, दि. बी. घोरपडे, आर. आर. शिंदे यांच्या पथकाने सदरच्या ठिकाणी छापा टाकला तेथे ज्वारी आणि मकाचे पिक दिसून आले. त्यानंतर गोपनीय माहितीनुसार या पिकाच्या मध्यभागी जावून पाहणी केली असता तेथे 30 बाय 30 फुट जागेत अफूची लागवड केल्याचे दिसून आले.

पोलिसांनी शेतात लागवड केलेली अफूची 4275 लहान-मोठी झाडे त्यास हिरवट, पांढरट लहान मोठी बोंडे असलेली झाडे उपटून त्याचे वजन वजन केले असता ते 50 किलो 300 ग्रॅम भरले. त्याची किंमत 4 लाख 27 हजार 500 रुपये एवढी असून पोलिसांनी तो मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री विखेंवर भाजपची मोठी जबाबदारी; कोल्हेंना…

माजी खा. डॉ. सुजय विखे नगर दक्षिणचे, उत्तर नगर जिल्हा माजी आ. स्नेहलता कोल्हे...

राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट? नेमकं काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का?...

पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी टोळी जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

४ गुन्हे उघडकीस; ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, मुख्य सूत्रधारासह तिघे अटकेत ​अहिल्यानगर /...

​घोसपुरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दागिन्यांसह मोठा ऐवज लंपास

​अज्ञात चोरट्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; परिसरात भीतीचे वातावरण ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री...