spot_img
अहमदनगरसंदीप कोतकर यांच्यासह समर्थकांवर खोटा गुन्हा; कार्यकर्त्यांनी घेतली मोठी भूमिका..

संदीप कोतकर यांच्यासह समर्थकांवर खोटा गुन्हा; कार्यकर्त्यांनी घेतली मोठी भूमिका..

spot_img

सचिन कोतकरसह शिष्ट मंडळाने घेतली एसपींची भेट / घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी
अहिल्यनगर / नगर सह्याद्री :
शहराचे माजी महापौर संदीप कोतकर हे केडगाव येथे आल्यावर त्यांची ग्रामस्थांनी भेट घेतल्यावर केडगाव देवीची दर्शन घेऊन ते निवासस्थानी निघून गेले. पंरतु संग्राम कोतकर यांनी मनात पुर्वग्रह ठेवून कुकारस्थान रचण्याच्या उद्देशाने गुरुवारी (दि. 23) रात्री कोतवाली पोलिस ठाण्यात खोटी फिर्याद दिली आहे. संबधीत फिर्याद ही खोटी असून संबधीत प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी सचिन कोतकर यांच्यासह शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन मागणी केली आहे.

संबधीत फिर्याद देणाऱ्यांचे मोबाईल कॉल डिटेल्स व रेकॉडींग तपासून त्यांना संपर्क करणारे संशयीत व्यक्ती व राजकीय दबाव टाकणारे यांचा शोध लावण्यास मदत होऊन संबधीत घटनेची सत्यतता तपासण्यास सहकार्य होईल. फिर्याद देणार हे न्युसेन्सिकल पार्श्‍वभुमी असलेले व उपद्रवी व्यक्ती असून विनाकारण खोट्या केसेस, खटले दाखल करण्याची सवय आहे. अशा उपद्रवी लोकांमुळे परिसरातील आमच्यासरख्या नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे वारंवार कौटुंबिक जीवन विस्कळीत होत आहे. वरील नोंदविलेल्या खोट्या तक्रारीची योग्य ती शहानिशा करावी, तसेच फिर्यादीचे व त्यांच्या संपर्कातील व्यक्तीचे मोबाईल कॉल डिटेल्स तपासून कारवाई करावी, कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल झालेली फिर्याद रद्द करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

यावेळी शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनावर विजय कराळे, राहुल कांबळे, गणेश साळुंके, विनोद लगड,गणेश सातपुते, संतोष बारस्कर, आदित्य शिंदे, सागर सातपुते, भुषण गुंड, सिराज शेख, महेश कांबळे, सचिन सातपुते, अमोल सातपुते, संकेत सातपुते, सोमनाथ कराळे, नवनाथ घेबुंड, राजेश सातपुते, प्रशांत कार्ले, अभिजित ठुबे, अशोक कराळे, ऋषिकेश सातपुते, सौरभ कोतकर, अशोक कोतकर यांच्या सह्या आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महापालिकेत कोणताही घोटाळा नाही; आयुक्तांचे स्पष्टीकरण, आमदार जगताप यांच्याबद्दल म्हणाले…

  महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचे स्पष्टीकरण अहिल्यानगर / नगर सह्याद्री - महानगरपालिकेत सुमारे ७७६...

महादेव मुंडे हत्या प्रकरण: न्याय मिळत नसल्याने पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

ज्ञानेश्वरी मुंडेने घेतले विष । बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल बीड | नगर सह्याद्री राज्यात संतोष देशमुख...

११ गावांसह २१ वाड्यांना मिळणार पाणी; मंत्री विखे पाटील यांची मोठी माहिती

संगमनेर | नगर सह्याद्री अकोले तालुयातील पिंपळगाव खांड धरणातून संगमनेर तालुयातील पठार भागातील जवळे बाळेश्वरसह...

मविआच्या आमदारांचं टॉवेल-बनियनवर आंदोलन

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. बुधवारी विरोधकांनी सत्ताधार्‍यांविरोधात आक्रमक पवित्रा...