नवी दिल्ली / वृत्तसंस्था :
तुम्हाला जर परदेश दौऱ्यावर जावे लागले तर. त्यासाठी पासपोर्ट असणे अतिशय आवश्यक आहे. पासपोर्टशिवाय तुम्ही परदेशात प्रवास करू शकत नाही. म्हणूनच लोक जेव्हा परदेशात जाण्यासाठी टूर प्लॅन करतात. तेव्हा मग तो पासपोर्टसाठी आगाऊ अर्ज करतो. जेणेकरून प्रवास करण्यापूर्वी त्यांचा पासपोर्ट जवळ असेल. जेणेकरून प्रवासाला जाण्यास कोणतीही अडचण येणार नाही.
मात्र गेल्या वर्षांपासून बनावट पासपोर्टचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे फेक पासपोर्ट वापरल्यास आता कडक कारवाई होणार आहे. नवीन इमिग्रेशन विधेयकात याबद्दल काही तरदूत करण्यात आली आहे.
भारतात प्रवेश करण्यासाठी, राहण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी बनावट पासपोर्ट किंवा व्हिसा वापरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सात वर्षापर्यंत तुरुंगवास आणि १० लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येईल. नवीन इमिग्रेशन विधेयकात ही तरतूद करण्यात आली आहे.
लोकसभेत सादर विधेयकानुसार, ‘जो कोणी जाणूनबुजून भारतात प्रवेश करण्यासाठी किंवा राहण्यासाठी किंवा भारताबाहेर जाण्यासाठी बनावट पासपोर्ट किंवा इतर दस्तऐवजाचा वापर करेल, त्याला सात वर्षापर्यंत दोन्ही प्रकारची शिक्षा होऊ शकते.’
याशिवाय असे करणाऱ्या व्यक्तीला किमान एक लाख रुपये आणि जास्तीत जास्त दहा लाख रुपये दंडही आकारला जाईल. या विधेयकात हॉटेल, विद्यापीठे, इतर शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि नर्सिंग होमना परदेशी लोकांबद्दल माहिती देणे बंधनकारक करण्याची तरतूद आहे.
जर कोणताही परदेशी व्यक्ती बनावट कागदपत्रांसह भारतात प्रवेश करत असेल तर त्याला येथून हद्दपार केले जाऊ शकते. असं देखील सांगण्यात आलं आहे. यापूर्वी १ लाख दंड आकारला जात होता आता तो १० लाख रुपयांपर्यंत वाढवला जाणार आहे. याशिवाय, २ वर्षांचा तुरुंगवास ७ वर्षांपर्यंत वाढवता गेला आहे.
जुने कायदे संपणार –
हे विधेयक मंजूर झाल्यास जुने इमिग्रेशन आणि परदेशी यांच्याशी संबंधित चार प्रमुख कायदे रद्द होतील.
1. परदेशी कायदा, 1946
2. पासपोर्ट (भारतात प्रवेश) कायदा, 1920
3. परदेशी नोंदणी कायदा, 1939
4. इमिग्रेशन कायदा, 2000
परदेशात तुमचा ‘भारतीय पासपोर्ट’ हरवल्यावर काय नेमकं करावं?
परदेशात प्रवास करताना तुमचा पासपोर्ट गमावणे ही एक त्रासदायक परिस्थिती असू शकते. परंतु, त्वरित उपाययोजना करून तुम्ही या परिस्थितीतून सहज बाहेर पडू शकता. तुमचा पासपोर्ट हरवला तर तुम्ही काय करावे याबद्दल आता पाहुयात…..
पोलिस तक्रार नोंदवा :
तुमचा पासपोर्ट हरवला किंवा चोरीला गेला असेल तर प्रथम पोलिस तक्रार नोंदवा. तुम्ही जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये किंवा ऑनलाइन तक्रार नोंदवू शकता. हा अहवाल तुमचा पासपोर्ट हरवल्याचा पुरावा आहे.
अहवालाची प्रत तुम्हाला पुढील कारवाई करण्यात मदत करेल. अहवालाची मूळ प्रत तुमच्याकडे ठेवा कारण पुनर्प्राप्ती प्रक्रियेदरम्यान अधिकाऱ्यांना त्याची आवश्यकता भासू शकते.
भारतीय दूतावासाशी संपर्क साधा :
पोलिस अहवाल दाखल केल्यानंतर, भारतीय दूतावास किंवा वाणिज्य दूतावासाशी संपर्क साधा. तुमचा पासपोर्ट हरवल्यास हे तुम्हाला मदत करतील.
हे तुम्हाला नवीन पासपोर्ट किंवा आणीबाणी प्रमाणपत्र (EC) मिळविण्यात मदत करतील, जे तुम्हाला तात्पुरते भारतात परत येण्याची परवानगी देतात.
नवीन पासपोर्ट किंवा आपत्कालीन प्रमाणपत्रासाठी अर्ज करा :
तुम्ही नवीन पासपोर्टसाठी अर्ज करू शकता किंवा आपत्कालीन प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकता. इमर्जन्सी सर्टिफिकेट तुम्हाला तुमचा पासपोर्ट हरवल्यास तो परत करण्याची परवानगी देतो.
नवीन पासपोर्ट – जर तुम्हाला नवीन पासपोर्ट बनवायचा असेल तर त्याला सुमारे एक आठवडा लागू शकतो. तसेच, तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे असावीत, ज्यात पत्त्याचा पुरावा, जन्मतारखेचा पुरावा आणि पोलिस अहवाल यांचा समावेश आहे.
इमर्जन्सी सर्टिफिकेट – जर तुम्हाला लवकरच भारतात परत यायचे असेल तर तुम्ही आपत्कालीन प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकता. हा एक तात्पुरता दस्तऐवज आहे, जो तुम्हाला परत येण्याची परवानगी देतो. पण, भारतात पोहोचल्यानंतर तुम्हाला नवीन पासपोर्टसाठी अर्ज करावा लागेल.