अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
खातेदारांनी बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार घडला. गोल्ड व्हॅल्युअरच्या संगमतीने बनावट सोने तारण ठेवले. बँकेची तब्बल 17 लाख 73 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी बॅंकेचे मॅनेजर आनंद बाबासाहेब डोळसे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार चार जणांवर गुन्हा दाखल झाला असून तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीमध्ये एका महीलेचा समावेश आहे.
जामखेड शहरातील बॅंकेत खातेदारांनी तारण ठेवलेले सोन्याच्या दागिन्यांचे क्षेत्रिय कार्यालय याच्या मार्फत झाली. त्यावेळी सदरचा प्रकार उघडकीस आला. बँक शाखेत गोल्ड व्हॅल्युअर आण्णासाहेब नामदेव कोल्हे (रा. शिवम ज्वेलर्स बीड कॉर्नर जामखेड जि. अहिल्यानगर) कार्यरत होते. यावेळी खातेदार मुनावर अजीम खान पठाण (रा. नुराणी कॉलणी जामखेड जिल्हा अहिल्यानगर) यांनी ५ लाख ८४ हजार ३७५ रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे तारण ठेवत ४ लाख ५५ हजाराचे तारण कर्ज घेतले. खातेदार महिला अनिता संतोष जमदाडे (रा. बाजारतळ जामखेड जि. अहिल्यानगर) यांनी ८ लाख ६१ हजार ५५ रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे तारण ठेवत ६ लाख ७० हजाराचे तारण कर्ज घेतले.
तसेच खातेदार दिगांबर उत्तम आजबे (रा. आजबे वाडा, मेन रोड, जामखेड जि. अहिल्यानगर) यांनी ८ लाख ५३ हजार १४ रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे तारण ठेवत ६ लाख ४८ हजाराचे तारण कर्ज घेतले. तपासात वरील खातेदारांनी तारण ठेवलेले सोने बनावट असल्याचे निष्पन्न झाले.बॅंकेचा गोल्ड व्हॅल्युअर आण्णासाहेब कोल्हे यांच्या संगमतीने खातेदारानी बॅंकेची 17 लाख 73 हजार रुपयांची फसवणूक केली.