spot_img
अहमदनगरअहिल्यानगरमध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्र रॅकेटचा पर्दाफाश! नऊ आरोपी जेरबंद

अहिल्यानगरमध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्र रॅकेटचा पर्दाफाश! नऊ आरोपी जेरबंद

spot_img

आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई | नऊ आरोपी जेरबंद; वैश्विक दिव्यांगत्व प्रणालीचा गैरवापर
अहिल्यानगर | नगर सह्याद्री

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वैश्विक दिव्यांगत्व प्रणालीचा आयडी व पासवर्ड चोरून शेकडो बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे तयार करणार्‍या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेने केला आहे. या प्रकरणी आतापर्यंत तब्बल ९ आरोपी निष्पन्न झाले असून, आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अति. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी याबाबत तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा (क्र. १९८९/२०२५) दाखल केल्यानंतर, गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या आदेशाने आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगेश जाधव तपास करत आहेत.

तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. सिव्हील हॉस्पिटल, अहिल्यानगर येथून १४२ दिव्यांग प्रमाणपत्रे डबल जाबक क्रमांक नोंदवून संशयास्पद रित्या वितरित करण्यात आली आहेत. पोलीस अधीक्षक यांनी स्वतः या तपासात लक्ष घालून जिल्हा शल्यचिकित्सकांना तातडीने १४२ प्रकरणांची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या गंभीर गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी तांत्रिक मदत घेऊन पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणाबाबत माहिती असल्यास नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संगमनेरमध्ये गुंडगिरी, शहराची विस्कटलेली घडी सुरळीत करणार; आमदार तांबे काय म्हणाले पहा

बाळासाहेब थोरात नेतृत्वात सेवा समिती संगमनेरच्या विकासासाठी कटिबद्ध आमदार सत्यजित तांबे | शहराची विस्कटलेली...

वाळू तस्करांची दहशत संपुष्टात!; पोलिसांनी काय केले पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री राहुरी तालुयात सामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरवून बेकायदेशीर वाळू तस्करी करणारे तसेच...

पक्षातून हकालपट्टी होताच शिवसेना नेते ढसाढसा रडले; अहिल्यानगरमध्ये नेमकं काय घडलं पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - पक्षाचा एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ठाकरेंच्या शिवसेनेतून...

महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

आयुक्त यशवंत डांगे | २७ नोव्हेंबरपर्यंत हरकतींसाठी मुदत अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक...