spot_img
अहमदनगरPolitics News: पारनेरमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी! 'यांनी' दिला मोठा इशारा

Politics News: पारनेरमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी! ‘यांनी’ दिला मोठा इशारा

spot_img

Politics News: अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर-नगर मतदारसंघात (Parner-Nagar Matadarasaṅgha) महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पारनेर विधानसभा मतदासंघाची जागा शिवसेना ठाकरे गटाला न सोडल्यास बंडखोरी होईल असा इशाराच ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख, जिल्हा परिषदचे सदस्य संदेश कार्ले (Sandesa karle) यांनी दिला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुशंघाने महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सर्वच इच्छुकांनी उमेदवारीची चाचपणी सुरु केलीय. तसेच संभाव्य उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केलीय. वरिष्ठ पातळीवर जागा वाटपाच्या चर्चा सुरु आहेत. पारनेर -नगर मतदारसंघात नीलेश लंके
( Nilesh Lanka ) यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन खासदारकी लढवली आणि ते लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आल्यानंतर आता त्यांच्या जागी येणार्‍या निवडणुकीत त्यांच्या पत्नी राणीताई लंके उभ्या राहणार असल्याचे संकेत खुद्द खासदार लंके यांनी दिले आहेत.

त्या पार्श्वभूमीवर राणीताई लंके (Ranitai Lanka) सध्या मतदारसंघात विविध कार्यक्रमांसह मतदारांच्या भेटी घेत आहेत. पारनेर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असून लोकसभा निवडणुकीच्या वेळेस शिवसेनेने मोठे मन करून नीलेश लंके यांना निवडून आणण्यासाठी मदत केली होती. त्यामुळे आता खासदार लंके यांनी मनाचा मोठेपणा दाखवून आमदारकीला हा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी सोडावा, अन्यथा शिवसैनिक अन्याय सहन करणार नाहीत. वेळप्रसंगी बंडखोरी होईल, असा थेट इशाराही संदेश कार्ले यांनी दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मांडओहळ धरणातून उद्या आवर्तन सुटणार ; आ. काशिनाथ दातेंच्या अधिकाऱ्यांना सूचना

पारनेर / नगर सह्याद्री - सोमवार दि. २३ डिसेंबर २०२४ परतीचा मान्सून समाधानकारक न झाल्यामुळे...

परभणीत राहुल गांधींचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले पहा

परभणी / नगर सह्याद्री - सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येवरून राज्यातील राजकारण तापलंय. सूर्यवंशी यांच्या...

पुणतांब्यात धार्मिक स्थळी तोडफोड; ग्रामस्थ आक्रमक

राहता । नगर सहयाद्री:- राहता तालुक्यातील पुणतांबा गावात अज्ञात समाजकंटकांनी एका धार्मिकस्थळी तोडफोड केल्याची घटना...

Weather Update: हवामान बिघडलं! हिवाळ्यात पावसाळा; हवामान विभागाकडून अलर्ट

Weather Update: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. थंडीचा कडाका वाढत असतानाच राज्यात पाऊस बरसणार असल्याची...