spot_img
महाराष्ट्रफडणवीसांचा ठाकरेंना दणका, 35 नेत्यांचा राजीनामा, पहा काय घडलं

फडणवीसांचा ठाकरेंना दणका, 35 नेत्यांचा राजीनामा, पहा काय घडलं

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्य संघटक एकनाथ पवार यांनी राजीनामा दिला. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ पवार हे लोहा – कंधार मतदारसंघाचे ठाकरे गटचे उमेदवार देखील होते. एकनाथ पवार यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला नांदेडमध्ये मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरत नाहीत तोच आता भाजपनं छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का दिला आहे. जिल्ह्यात पक्षाला खिंडार पडलं आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या 35 स्थानिक नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

लवकरच महापालिका निवडणुका लागू शकतात, अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या 35 स्थानिक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपची ताकत आणखी वाढली आहे.

शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के
विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. अनेक नेत्यांनी महायुतीची वाट धरल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीमधील शिवसेना ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे. शिवसेना ठाकरे गटातील नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत आहेत. सोमवारीच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्य संघटक एकनाथ पवार यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडलं आहे. जळगावमधील शिवसेना ठाकरे गटाचे काही नाराज माजी नगरसेवक हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत अशी देखील एक बातमी समोर येत आहे.

दुसरीकडे शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी काल मोठा दावा केला आहे. 23 जानेवारीला राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे आमदार आमच्या संर्पकात असून, ते शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छूक आहेत, असं शेवाळे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे 23 तारखेला नेमकं काय घडणार? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या, ‘तो’ व्हिडीओ आला समोर

बीड / नगर सह्याद्री - संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचे पाय...

‌‘त्या‌’ लाडक्या बहिणींंना पैसे परत करावे लागणार! कारण आलं समोर..

मुंबई | नगर सह्याद्री महायुती सरकारला पुन्हा एकदा सत्तेत आणण्यासाठी गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण...

सिद्धिबाग शॉपिंग कॉम्प्लेक्सचे 11 लाख वसूल; उपायुक्त म्हणाले, माफीचा लाभ घ्या,अन्यथा…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महानगरपालिकेच्या वतीने कर वसुलीसाठी जोरदार मोहीम हाती घेतले असून आयुक्त यशवंत...

पाणीपट्टी वाढणारच…!; निर्णयावर प्रशासन ठाम

मध्यमार्ग काढण्याच्या हालचाली अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेने दुपटीने वाढवलेल्या पाणीपट्टीला विरोध सुरू असला, तरी...