spot_img
अहमदनगरदुकानाच्या नावाखाली खंडणी उकळल्याचा प्रकार! जिल्हाधिकारी आणि एसपींचे नाव वापरल्याचा आरोप

दुकानाच्या नावाखाली खंडणी उकळल्याचा प्रकार! जिल्हाधिकारी आणि एसपींचे नाव वापरल्याचा आरोप

spot_img

जिल्हाधिकारी आणि एसपींचे नाव वापरल्याचा आरोप | डोंगरे यांच्या आडून बराते, रकटे यांनी अनेकदा खंडणी घेतल्याचा देशमुखांचा आरोप
अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
कोतूळ (अकोले) येथील देशी दारुचे दुकान कायदेशिर मार्गाचा अवलंब करत भागीदारीत चालू आहे. त्यात गैर काहीच नाही. मात्र, असे असताना भागीदारीतील डोंगरे यांना वाघापूर येथील सरपंच नसणारे परंतू सरपंच असल्याचे भासविणारे महेंद्र बराते आणि भाजपाचा जिल्हाध्यक्ष असल्याचे भासविणाऱ्या भाऊसाहेब रकटे या दोन तोतयांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उत्पादन शुल्क अधीक्षक यांच्या नावाने धमकी देत 5 लाख 40 हजारांची खंडणी वसूल केली. आणखी पंधरा लाख द्या नाहीतर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्याला समोर उपोषण करू अशी धमकी दिली. या सततच्या प्रकाराला वैतागून तक्रारदार शिवाजी देशमुख यांनी थेट पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक व अकोले पोलिसात तक्रार दाखल केली असल्याचे समोर आले आहे.

सविस्तर वृत्त असे की कोतुळ येथील देशमुख डोंगरे लिकर्स या नावाने देशी दारूचे दुकान गेल्या 24 वर्षांपासन एकत्रित व्यवसायात सुरू आहे. सन 2013 साली मूळ मालक भाऊसाहेब डोंगरे यांनी हा परवाना आपला मुलगा नवनाथ डोंगरे व शिवाजी तुकाराम देशमुख यांच्या नावे सक्षम अधिकारी व भागिदारी नियमाप्रमाणे करून दिला आहे. दरम्यान देशमुख व डोंगरे यांच्यात 23 वर्षात कधीही वाद तंटा झाला नाही. अधिकृत सीएंच्या ऑडिट प्रमाणे नफ्याची रक्कम ठरलेल्या नियमाप्रमाणे गरजेनुसार डोंगरे हे रोख स्वरूपात नेत होते. तशा नोंदी देखील देशमुख व डोंगरे यांच्या डायऱ्यांमध्ये आहे.

मात्र अचानक काही महिन्यांपूव डोंगरे यांनी मला भागीदारीचे पैसे मिळत नाही अशी खोटी तक्रार उत्पादन शुल्क विभागाकडे व जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.त्या संदर्भात न्याय प्रकिया सुरू आहे. सदर प्रकरण एकत्र बसून मिटवू यासाठी डोंगरे यांचा दूरचा नातेवाईक व परवान्याशी संबंधित नसलेला इसम महेंद्र रघुनाथ बराते तसेच भाऊसाहेब शंकर रकटे यांनी या प्रकरणात आम्ही मध्यस्थीत करतो, आम्हाला 25 लाख रुपये द्या अशी मागणी केली ही मागणी देशमुख व त्यांच्या मित्र नातेवाईकांकडेही केली. मात्र ही रक्कम खूप मोठी असल्याने मी ती देऊ शकत नाही असे शिवाजी देशमुख यांनी सांगितले. दरम्यान रकटे व बाराते यांनी नवनाथ डोंगरे या भागीदारास भडकवून वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे खोटी निवेदने उपोषणे अशी निवेदने तसेच दुकानात कामाला असलेल्या कामगारांना शिवीगाळ दुकानाचे नुकसान असे सुरू केले.

याबाबत रीतसर गुन्हेही दाखल करण्यात आला असल्याचे देशमुख यांनी निवेदनात म्हटले आहे. बराते आणि रकटे यांच्या सांगण्यानुसार नवनाथ डोंगरे हा भागीदार दररोज दुकानातून येऊन पाच- दहा हजाराच्या रकमा बळजबरीने नेऊ लागला. असे अनेक महिने चालले त्याचे सर्व सीसीटीव्ही चित्रीकरण आपल्याकडे असल्याचे शिवाजी देशमुख यांनी म्हटले आहे. शिवाय ते प्रमाणित करण्यात आलेले आहे. डोंगरे यांच्याशी रितसर भागीदार असून त्याबाबतची कागदपत्रे आपल्याकडे आहेत. त्यानुसारच उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही केली असल्याचेही देशमुख यांनी निवेदनात म्हटले आहे.

बराते याच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे!
महेंद्र बराते त्याच्या विरोधात अकोले पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत खंडणी, धमकी, बलात्कार अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. संबंधित व्यक्ती विरोधात महिलांनी गावात आंदोलन केले होते. सध्या वाघापूर गावचा लोकनियुक्त सरपंच म्हणून तर भाऊसाहेब रकटे हा भाजपचा जिल्हाध्यक्ष म्हणून प्रत्येक कार्यालयात अधिकाऱ्यांवर प्रभाव निर्माण करतात.मात्र, प्रत्यक्षात हे या पदावर नसल्याचेही देशमुख यांनी म्हटले आहे.

पत्नीला सरपंच करण्यासाठी तीन लाख उकळले!
महेंद्र बराते यांनी तीन लाख रोख तसेच पत्नीला सरपंच करण्यासाठी वाघापूर ग्रामपंचायत निवडणूक म्हणून दोन लाख. तसेच भाऊसाहेब रकटे यांचे संगमनेर येथील सानप हॉस्पिटलचे 40 हजार रुपये बिल आपल्याकडून वसुल करण्यात आले असल्याचे शिवाजी देशमुख यांनी म्हटले आहे. यानंतर काही काळ देशमुख – डोंगरे यांचे प्रकरण शांत झाले. मात्र बराते व रकटे यांनी आम्हाला पंधरा लाख रुपये द्या नाहीतर आम्ही पोलीस एसपी, उत्पादन शुल्क एस पी, आणि जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन उपोषण करू ते आमच्या ओळखीचे आहेत तसे त्या कार्यालयातील अधिकाऱ्यांशी भेटल्याचे पुरावे दाखवून आम्हाला पंधरा लाख द्या अशेी मागणी करत असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाविकास आघाडीला धक्का; ‘ती’ याचिका फेटाळली

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या प्रकरणात महाविकास आघाडीला गुरुवारी धक्का...

…’ते’ वादाच्या दिशेने जात आहेत; मनोज जरांगेंची धनंजय मुंडेंवर टीका

Manoj Jarange Patil: चिल्लर चाळे करायला लागल्याने धनंजय मुंडे हे जातीय वादाच्या दिशेने जात...

कव्वाली वाजवणाऱ्यांचा कार्यक्रम लागला; आमदार संग्राम जगताप यांनी घेतला विरोधकांचा समाचार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- नगरच्या इतिहासात गणपती विसर्जन मिरवणुकीत आत्तापर्यंत कधीच कव्वाली वाजविली गेली नाही....

राज्यात पुन्हा वाढणार हुडहुडी! येत्या तीन दिवसांत अवकाळी पावसाचा इशारा

मुंबई | नगर सह्याद्री:- उत्तरेकडील राज्यांमध्ये वाढलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम देशभरात होत असल्याचे पाहायला मिळत...