spot_img
ब्रेकिंगमिशिदीत स्फोट; महाराष्ट्रात भयंकर प्रकार..

मिशिदीत स्फोट; महाराष्ट्रात भयंकर प्रकार..

spot_img

Maharashtra Crime News: मशीद स्फोटप्रकरणी २ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडे असे या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही आरोपी अर्धमसला गावातील रहिवासी आहेत. प्राथमिक माहितीनुसार, वैयक्तिक भांडणातून आणि नशेच्या अधीन जाऊन हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अर्धमसला येथे मशिदीत जिलेटिनच्या कांड्या ठेवून स्पॉट घडवून आणला होता. या भयानक स्फोटात मशिदीतील फरशी फुटली तसेच भिंतीला भेगा पडल्या होत्या. या स्फोटात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी आता दोघांना अटक केली आहे.

श्रीराम सागडे आणि विजय गव्हाणे असे २ आरोपींची नावे आहेत. हे आरोपी अर्धमसला गावातील रहिवासी आहेत. दोन्ही आरोपी शेतकरी कुटुंबातील आहेत. विजय गव्हाणे या आरोपीवर अपघाताचा गुन्हा दाखल आहे. त्याचे आई वडील हे अपंग असून, ते शेतीचे काम करतात. तर, श्रीराम सागडे याचे आई-वडील देखील शेतीचे काम करतात.

इन्स्टाग्रामवर बनवला रील
बीडच्या अर्धमसला या गावात मशिदीत स्फोट घडवून आणण्यापूर्वी दोन्ही आरोपींनी इन्स्टाग्रामवर रील तयार केले होते. ‘शिस्तीत राहा बेट्या. मी अंगार भंगार नाय रं’ या गाण्यावर त्यांनी रील तयार केलं होतं. या व्हिडिओमध्ये आरोपीच्या हातात जिलेटिनच्या कांड्या आणि तोंडात सिगारेट आहे. स्फोट घडल्यानंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अग्नीतांडव! फटाका कारखान्यात भीषण स्फोट, १७ जणांचा मृत्यू; कुठे घडला प्रकार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - गुजरात राज्यातून आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे....

घरात घुसून महिलेसोबत ‘तसले’ वर्तन; रावसाहेबवर गुन्हा दाखल

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर तालुक्यातील एका गावात मद्य सेवन केलेल्या व्यक्तीने महिलेच्या घरात जबरदस्ती...

गावच्या विकासासाठी आमदार काशिनाथ दातेंनी दिला कानमंत्र; काय म्हणाले पहा…

नेप्तीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन अहिल्यानगर | नगर सह्याद्री गावा-गावातील धार्मिक एकात्मता भारतीय संस्कृतीने जोडली गेलेली आहे....

‘पारनेर ग्रामीण पतसंस्थेला ४.४३ कोटींचा नफा’

संस्थापक आ. काशिनाथ दातेंची माहिती पारनेर । नगर सहयाद्री:- सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ पारनेर...