spot_img
अहमदनगरखासदार निलेश लंकेंचे स्पष्टीकरण ; गजा मारणेची भेट हा केवळ अपघात

खासदार निलेश लंकेंचे स्पष्टीकरण ; गजा मारणेची भेट हा केवळ अपघात

spot_img

 

पुणे : नगर सह्याद्री

गुंड गजा मारणेची भेट घेतल्यानंतर निलेश लंके यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू झाल्यानंतर लंके यांनी आता त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. गजा मारणे याच्याशी झालेली भेट हा केवळ अपघात होता, मला त्याची पार्श्वभूमी माहिती नव्हती असं खासदार निलेश लंके यांनी स्पष्ट केलंय.

अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणे याची भेट घेतली. लंकेंची ही भेट त्यांना अडचणीची ठरल्याचं दिसून येतंय. खासदार निलेश लंकेंनी गुरुवारी कुख्यात गुंड गजा मारणेच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. गजा मारणेने निलेश लंकेंचा सत्कार केला. निलेश लंके यांनी त्याच्याकडून सत्कारही स्वीकारला आहे. यामुळे यावरुन राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर टीका केली.

गजा मारणेच्या भेटीनंतर निलेश लंके म्हणाले की, गजा मारणे याच्याशी झालेली भेट ही केवळ अपघात होता. मला गजा मारणे यांची पार्श्वभूमी माहिती नव्हती. अमोल मिटकरी यांना मीडियासमोर बोलण्यासाठी ठेवले असल्याने काहीही बोलतात.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...