spot_img
अहमदनगरखळबळजनक! 'ती' घटना सीसीटीव्हीत कैद; मध्यरात्री नगर शहरात घडलं असं काही..

खळबळजनक! ‘ती’ घटना सीसीटीव्हीत कैद; मध्यरात्री नगर शहरात घडलं असं काही..

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री:-
शहरातील आगरकर मळ्यात सोमवारी (दि.२६) पहाटे ४ बंद घरे चोरट्यांनी फोडली आहेत. घरांच्या खिडक्यांचे गज तोडून चोरट्यांनी या चोऱ्या केल्या आहेत. मात्र चोरट्यांना या चारही घरात फार मोठा ऐवज हाती लागलेला नाही. हे चोरटे एका ४ चाकी गाडीतून आले होते. ते परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.एकाच रात्रीत ४ ठिकाणी चोऱ्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आगरकर मळा परिसरात राहणारे बेल्हेकर यांच्या घराच्या खिडकीचे गज तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत उचकापाचक केली. त्यानंतर त्याच पद्धतीने तेथून जवळच असलेल्या विशाल कॉलनीत गोहाड, व्यवहारे व आव्हाड यांची ३ घरे चोरट्यांनी फोडली आहेत. सोमवारी पहाटे ३.३० ते ३.४५ च्या सुमारास या चोऱ्या झाल्या आहेत. मात्र या चारही ठिकाणी मोठा ऐवज चोरट्यांच्या हाती लागला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

चोऱ्यांच्या या घटना सकाळी उघडकीस आल्यावर नागरिकांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी सर्व ठिकाणी पाहणी केल्यावर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पहाटे ३.३० च्या सुमारास ३-४ चोरटे एका चारचाकी वाहनातून या परिसरात आलेले दिसले.

सर्व चोरट्यांनी माकडटोप्या घातलेल्या होत्या, त्यामुळे त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सर्वच ठिकाणी चोरट्यांनी खिडक्यांचे गज तोडून आत प्रवेश केला असल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळाल्यावर शिवसेना ठाकरे गटाचे शहर विधानसभा समन्वयक दत्ता जाधव, माजी नगरसेवक प्रशांत गायकवाड, दत्ता खैरे यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

युवा उद्योजकाचे अपहरण; नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नगर-मनमाड रस्त्यावर असलेल्या नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार घडला आहे. युवा...

ठपका ठेवून कारवाई करू नका; कर्मचाऱ्यांचे आयुक्तांना निवेदन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात येणारे रँकिंग घसरल्याचा ठपका ठेवत मनपा आयुक्त...

सावधान! शिर्डी विमानतळ परिसरात ‘ती’ वस्तू वापर करण्यास बंदी..

शिर्डी । नगर सहयाद्री:- शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सापडले अडचणीत; दारू पाजून महिलेवर अत्याचार…

Crime News: हरियाणातील भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल...