spot_img
अहमदनगरखळबळजनक! अचानक मुलाला पोटदुखी आणि नंतर तर उलट्या....? 'तसल्या' घटनेनं तर गावच...

खळबळजनक! अचानक मुलाला पोटदुखी आणि नंतर तर उलट्या….? ‘तसल्या’ घटनेनं तर गावच हादरलं!

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री
जिल्ह्यातील एका घटनेनं खळबळ उडाली आहे. नेवासा तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. मयत तरुणाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील भांडणाच्या कारणावरून सदरचा प्रकार घडला आहे.

फिर्यादीनुसार, भाऊसाहेब परभत नेमाणे, मूळ रा. शिरेसायगाव, ता. गंगापूर हल्ली रा. खडकाफाटा, ता. नेवासा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 31 जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता त्यांचा मुलगा शरद नेमाणे हा घरासमोर उलट्या करताना दिसला. विचारले असता शरदने सांगितले की, सकाळी साडेअकरा वाजता अमोल खेमनर यांच्या शेतात गेल्यावर मागील भांडणाच्या कारणावरून अमोल किसन खेमनर, वच्छलाबाई किसन खेमनर आणि किसन खेमनर यांनी त्याला शिवीगाळ आणि दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी पोटात मारहाण केली.

मारहाणीनंतर शरदला पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने त्याची आई सुशीलाबाई त्याला नेवाशातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेली. पुढील दिवशी शरदचा त्रास वाढल्याने त्याला सरकारी रुग्णालयात दाखल केले असता, अडीच वाजता त्यास मृत घोषित करण्यात आले.या फिर्यादीवरून अमोल किसन खेमनर, वच्छलाबाई किसन खेमनर आणि किसन खेमनर यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 115(2), 351(2) आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार दाते यांनी पारनेरचे मुद्दे गाजवले!, विधानसभेत पोलिसांच्या शौर्याचा गौरव करत केली मोठी मागणी..

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चाललेली कायदा व सुव्यवस्थेची समस्या, अमली पदार्थांचे...

राज्यात मेगा भरती: मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली मोठी माहिती..

मुंबई । नगर सहयाद्री राज्यात 150 दिवसांच्या उद्दिष्टपूत कार्यक्रमानंतर राज्यात मेगा भरती होणार आहे....

नगर-पुणे प्रवास होणार दीड तासात; नवा रेल्वे मार्ग..

पुणे । नगर सहयाद्री:- बहुप्रतीक्षित पुणे-अहिल्यानगर नवीन रेल्वे मार्ग लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. याबाबत सविस्तर...

आमदार सत्यजित तांबे यांची मोठी मागणी; वकीलबांधवांसाठी ‘तो’ कायदा लागू करा

Satyajit Tambe: नाशिक जिल्ह्यातील माडसांगवी येथे ॲड. रामेश्वर बोऱ्हाडे यांच्यावर नुकताच प्राणघातक हल्ला झाला....