अहमदनगर । नगर सहयाद्री-
नवनागापूर परिसरातील सह्याद्री चौकात ४ जून रोजी एका तरुणांचा मृतदेह बेवारस अवस्थते मिळून आला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र पोलिसांना घातपात असल्याचा संशय होता. त्यानंतर दरम्यान सदरचा तरुण स्टीफन अविनाश मिरपगार (वय ३३ रा. आंधळे चीरनगर, नवनागापूर) असल्याचे समोर आले.
एमआयडीसी पोलिसांनी तपासादरम्यान घटना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्तबातमीदार यांच्याकडे चौकशी केली असता स्टीफनचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. ४ जून रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास सह्याद्री चौकात एका पान टपरी जवळ स्टीफन त्याच्या पत्नीसोबत व्हिडीओ कॉलवरून बोलत असताना संशयित आरोपींना तो आपली शुटींग काढत असल्याचा संशयातून त्यांनी सिमेंटचा ब्लॉक डोक्यात घालून स्टीफनची हत्या केली.
याप्रकरणी स्टीफन मिरपगार यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी संग्राम सोन्याबापू कदम (वय १९ रा. तलाठी कार्यालयाजवळ, नागापूर) याला अटक केली असून किरण बाळासाहेब गव्हाणे व सोन्या उर्फ गौतम भगवान अंभोरे (दोघे रा. शनिशिंगणापूर ता. नेवासा) हे दोघे पसार झाले आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलिस करत आहे.