spot_img
अहमदनगरखळबळजनक! उमेदवाराच्या घरावर गोळीबार;  धाड, धाड तीन राऊंड फायर..

खळबळजनक! उमेदवाराच्या घरावर गोळीबार;  धाड, धाड तीन राऊंड फायर..

spot_img

Crime News: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची प्रचाराची आज सांगता होणार आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात आला आहे. 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे. त्यातच आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी: सोमवार दि. १८ रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास अज्ञाताकडून जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसैन गुलाम हुसैन यांच्या घरावर गोळीबार करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी घटनास्थळी दाखल झाले आहे.

अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसैन गुलाम हुसेन यांच्या घरावर एका अज्ञात व्यक्तीने तीन गोळ्या झाडल्या. यामुळे मोठा आवाज झाल्याने शेख अहमद हुसैन गुलाम हुसेन खडबडून जागे झाले. त्यांनी याबाबत तपास केला असता काचेच्या खिडकीचा चक्काचूर झाल्याचे त्यांना दिसून आले.

त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना तीन रिकामी काडतुसे आढळून आली आहे. शेख अहमद हुसैन गुलाम हुसैन हे AIMIM पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांना अधिकृत उमेदवारी मिळाली नसल्यामुळे ते अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महापालिकेत कोणताही घोटाळा नाही; आयुक्तांचे स्पष्टीकरण, आमदार जगताप यांच्याबद्दल म्हणाले…

  महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचे स्पष्टीकरण अहिल्यानगर / नगर सह्याद्री - महानगरपालिकेत सुमारे ७७६...

महादेव मुंडे हत्या प्रकरण: न्याय मिळत नसल्याने पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

ज्ञानेश्वरी मुंडेने घेतले विष । बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल बीड | नगर सह्याद्री राज्यात संतोष देशमुख...

११ गावांसह २१ वाड्यांना मिळणार पाणी; मंत्री विखे पाटील यांची मोठी माहिती

संगमनेर | नगर सह्याद्री अकोले तालुयातील पिंपळगाव खांड धरणातून संगमनेर तालुयातील पठार भागातील जवळे बाळेश्वरसह...

मविआच्या आमदारांचं टॉवेल-बनियनवर आंदोलन

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. बुधवारी विरोधकांनी सत्ताधार्‍यांविरोधात आक्रमक पवित्रा...