नाशिक / नगर सह्याद्री : पोलीस अधिकाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक अशोक नजन (40) असे या मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. ही घटना आज मंगळवारी सकाळी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अंबड पोलीस ठाण्यात स्वतःच्या कॅबीनमध्ये आज सकाळी पोलीस निरीक्षक अशोक नजन (40) यांनी आज मंगळवारी सकाळी स्वतःच्या पिस्तूलमधून डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली. यामुळे नाशिक पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांचे आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडताच पोलिसांची मोठी धावपळ उडाली आहे.