spot_img
अहमदनगरखळबळजनक! रेल्वे पटरीवर आढळला मृतदेह? अहिल्यानगर मधील घटना..

खळबळजनक! रेल्वे पटरीवर आढळला मृतदेह? अहिल्यानगर मधील घटना..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
केडगाव (Kedgaon) उपनगरातील शिवाजीनगर येथील एका २० वर्षीय तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या (Suicide) केली. कृष्णा श्रीनाथ काळे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना ५ फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैशाची सतत मागणी व मानसिक त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या (Suicide) केली असल्याचे पुढे आले आहे.

अधिक माहिती अशी की, मयत कृष्णा काळे याचा ट्रॅक्टर त्याच्या ओळखीचा शरद रामचंद्र जाधव याने त्यांचे शेतीचे कामासाठी भाड्याने जामखेड येथील झिक्री गावी घेऊन गेला होता. त्यानंतर जुलै २०२४ महिन्यात कृष्णा काळे याचा साखरपुड्याचा कार्यक्रम असल्याने शरद जाधव याने त्याचे कार्यक्रमासाठी मदत म्हणुन ३० हजार रुपये हात उसने दिले होते.

मागील काही दिवसांपासुन कृष्णा काळे यास ट्रॅक्टरची गरज असल्याने तो वारंवार शरद जाधव यास ट्रॅक्टरची मागणी करीत होता. परंतु शरद जाधव हा आज देतो, उदया देतो असे म्हणुन वेळ मारुन नेत असे. ३० जानेवारी रोजी कृष्णा काळे हा झिक्री या गावी गेला असता त्याला तेथे शरद जाधवच्या सासरवाडीत ट्रॅक्टर मिळुन आला नाही. त्यावेळी कृष्णाने शरद जाधवकडे ट्रॅक्टरबाबत विचारणा केली असता, शरद जाधव याने तुझा ट्रॅक्टर आणुन देतो, असे सांगितले.

परंतु त्याने ट्रॅक्टर आणून दिला नाही. ३ फेब्रुवारी रोजी शरद जाधव याने शिवीगाळ, दमदाटी करुन तु मला ५० हजार रुपये दे, तेव्हाच तुझा ट्रॅक्टर देतो असे बोलला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कृष्णा याने शरद जाधव याला ३० हजार रुपये आत्ता देतो व बाकीचे राहिलेले पैसे नंतर देतो, असे सांगितल्यावर शरद जाधव याने मला पुर्ण ५० हजार रुपये पाहिजेत, तेव्हाच तुझा ट्रॅक्टर तुला परत देईन असे म्हणाला.

त्यानंतर शरद जाधव सोबत एक इसम असताना तो कृष्णा यास ‘तुझ्याकडुन पैसे देणे होत नसेल तर तु जीव देऊन टाक’ तसेच शरद जाधव सोबत असलेल्या इसमाने सुध्दा तु समोर असलेल्या रेल्वे पटरीवर जीव देऊन टाक असे म्हणाले. यानंतर ५ फेब्रुवारी रोजी कृष्णा याचा मृतदेह रेल्वे पटरीवर मिळून आला.

शरद जाधव व त्याच्यासोबत असलेल्या इसमाने दिलेल्या त्रासाला कंटाळुनच कृष्णा काळे यांनी रेल्वे पटरीवर जाऊन आत्महत्या केली, अशी तक्रार कृष्णाचा मामेभाऊ सुनील राजेश कुऱ्हाडे (रा. शिवाजीनगर, केडगाव) यांनी दिल्याने शरद जाधव व एक अनोळखी यांच्याविरुध्द कोतवाली पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संशयाच्या भुताने संसाराची राख रांगोळी; पत्नीचा निर्घुण खून

पत्नीचा निर्घुण खून । पतीला अटक अहिल्यानगर। नगर सहयाद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथे...

पेट्रोल पंपावर ऑनलाइन पेमेंट बंद! कारण काय?

मुंबई । नगर सहयाद्री:- डिजिटलच्या युगात सर्व ऑनलाइन झाले आहे. पेट्रोल भरल्यानंतरही आपण ऑनलाइन पद्धतीने...

धनलक्ष्मीचा योग आला! ‘या’ राशींच्या जीवनात पैशांचा पाऊस पडणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य एकदा का हे प्रश्न सुटले की घरातील वातावरण...

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...