अहमदनगर । नगर सहयाद्री:-
एकीकडे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात इच्छुकांची तयारी जोरात सुरू झाली आहे. तर दुसरीकडे निवडणुकीपूर्वीच माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सोमवारी मध्यरात्रीच्या दरम्यान मुरकुटे यांना श्रीरामपूरातील त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेत याप्रकरणी अटक केली आहे.
राहुरी तालुक्यातील एका महिलेने अत्याचार प्रकरणी सोमवारी दि. ७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी फिर्याद दाखल केली होती. मुरकुटे हे रात्री उशिरा श्रीरामपूर शहरात दाखल झाले. ते कामानिमित्त मुंबई येथे गेले होते. रात्री साडेअकराच्या दरम्यान राहुरी पोलिस त्यांच्या निवासस्थानी आले.
यानंतर त्यांना पोलिस ठाण्यात चौकशीनंतर अटक करण्यात आली. अटकेनंतर रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्याची त्यांनी तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना नगर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले आहे.