spot_img
ब्रेकिंगशहरात खळबळ! शिक्षकावर झाडली गोळी; शाळेतच विद्यर्थ्यांचा अतिरेकी प्रकार..

शहरात खळबळ! शिक्षकावर झाडली गोळी; शाळेतच विद्यर्थ्यांचा अतिरेकी प्रकार..

spot_img

Crime News : एका खासगी शाळेत नववीच्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आपल्या शिक्षकावर वर्गातच गोळी झाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोळीबारात शिक्षक गगनदीप कोहली गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोहली यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २० ऑगस्ट रोजी सकाळी ९.४५ वाजता काशीपूरमधील कुंडेश्वरी रोडवरील एका शाळेत घडली. गगनदीप कोहली हे भौतिकशास्त्राचा तास घेण्यासाठी शाळेत आले होते. तास संपल्यानंतर वर्गातून बाहेर पडत असताना, एका विद्यार्थ्याने जेवणाच्या डब्यात लपवलेले पिस्तूल बाहेर काढले आणि त्यांच्या दिशेने गोळी झाडली. गोळी त्यांच्या उजव्या खांद्याखाली लागल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकारानंतर विद्यार्थ्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र तत्काळ प्रतिसाद देणाऱ्या इतर शिक्षकांनी त्याला पकडून ठेवले. त्यानंतर जखमी शिक्षकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, विद्यार्थ्याने रागाच्या भरात हे टोकाचं पाऊल उचलले. काही दिवसांपूर्वी शिक्षकांनी सर्वांसमोर त्याला कानाखाली मारले होते, याचाचा राग त्याच्या मनात होता.

या प्रकरणी अल्पवयीन विद्यार्थ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील चौकशी सुरु असून, शिक्षक गगनदीप कोहली यांना पोलिस संरक्षण देण्यात आल्याचे एएसपी अभय सिंग यांनी स्पष्ट केले आहे.या प्रकारामुळे पालक आणि शिक्षक वर्गात मोठी भीती निर्माण झाली आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या हिंसाचाराच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शैक्षणिक संस्था आणि प्रशासनाने गंभीर पावले उचलण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दंडगव्हाळ, सपकाळेंनी खाकीची केली बेअब्रू!; एसपी साहेब, तुमच्या नावाचा होतोय गैरवापर!

अहिल्यानगर | नगर सह्याद्री पोलिस अधीक्षक म्हणून खमकी भूमिका बजावत असणाऱ्या सोमनाथ घार्गे यांच्या टीममध्ये...

गट, गणांची मोडतोड; कही खुशी कही गम; जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या गट-गणांची अंतिम प्रभाग रचना जाहीर

जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या गट-गणांची अंतिम प्रभाग रचना जाहीर | इच्छुकांचे मैदान ठरले अहिल्यानगर |...

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची मोठी कारवाई; गोवंशीय जनावरांची कत्तल करणारी टोळी १ वर्षासाठी हद्दपार

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची तिसरी मोठी कारवाई राहाता । नगर सहयाद्री  ममदापुर (ता. राहाता)...

पत्नीचा खून पतीची आत्महत्या; अहिल्यानगरमधील धक्कादायक घटना

कोपरगाव / नगर सह्याद्री : कोपरगाव तालुक्यातील चासनळी गावात शुक्रवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी सकाळी...