spot_img
अहमदनगरशहरात खळबळ! ट्रॅव्हल्सच्या ऑफिस समोर सापडला मृतदेह

शहरात खळबळ! ट्रॅव्हल्सच्या ऑफिस समोर सापडला मृतदेह

spot_img

Crime News : शिर्डी शहरातील नगर-मनमाड महामार्गावरील खंडोबा कॉम्प्लेक्स लगत मध्यरात्री झोपलेल्या व्यक्तीच्या खिशातून पाकीट चोरल्यानंतर चोरट्यांनी त्या व्यक्तीच्या कानशिलात जोरदार चापट मारल्याने ती व्यक्ती पेव्हर ब्लॉक वर पडून जखमी झाला व तेथे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही धटना शिर्डी शहरात रविवारी रात्री घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्ती खंडोबा कॉम्प्लेक्सच्या बंद असलेल्या दुकानांसमोर झोपलेली होती. त्याचवेळी तिघेजण तिथे आले आणि त्याच्या खिशात हात घालून सदर व्यक्तीचे पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. झोपेतून जागा झाल्यावर त्या अज्ञात व्यक्तीने त्यांना विरोध केला. यामुळे त्यांच्यात झटापट सुरू झाली. एका आरोपीने त्याच्या कानशिलात जोरदार थप्पड मारली.

त्यामुळे तो जमिनीवर पडून बेशुद्ध झाला आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. हा सर्व प्रकार मध्यरात्री घडला असून रात्री गस्तीवर असलेले पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे व गस्तीपथकातील पोलिसांना खंडोबा मंदिरा जवळ हमसफर ट्रॅव्हल्स ऑफिसच्या समोर अंदाजे 45 वर्षीय एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पेव्हर ब्लॉक वर पडलेला दिसला.

घटनास्थळाजवळ सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन व्यक्ती त्याच्याजवळ येऊन त्याचे खिशातील पाकीट काढून घेताना दिसत होते त्यांचेंमध्ये भांडण व झोंबा झोंबी झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत आरोपी किरण नंदकुमार काळे रा.नांदुर-शिंगोटे, विजय राजू जाधव रा. निमगाव व ऋषिकेश शिवाजी अंधारे रा.गंगापूर यांनी हा गुन्हा केल्याचे उघड झाले. त्यानुसार आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 105 309 (4) 3 (5) अन्वये शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विद्यार्थ्यांचा क्रुझर गाडीला ट्रक धडकला; ‘ईतक्या’ जणांचा मृत्यू, अहिल्यानगर–संभाजीनगर महामार्गावरील घटना…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला शिवारात आज पहाटे भीषण अपघात घडला....

काका पुतणे एकत्र येणार का? सुप्रिया सुळेंची महत्वाची प्रतिक्रिया; १० तारखेला..

Politics News: सध्या महाराष्ट्रात मान्सूनपेक्षा राजकीय मनोमिलनाचे वारे जोरदार वाहू लागले आहे. अशातच दुरावलेले...

आजचे राशी भविष्य! कुणाच्या कुंडलीत प्रेम, पद, पैसे प्राप्तीचा योग? पहा एका क्लिकवर..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य आज तुमची काही वाईट सवय तुमच्या प्रेमीला वाईट...

पावसामुळे नुकसान झालेल्या केडगाव अमरधाम, आंबेडकर भवनाची आयुक्तांकडून पाहणी

पडलेल्या भिंती बांधण्याचे काम तत्काळ सुरू करा : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे अहिल्यानगर ।...