मुंबई । नगर सहयाद्री:-
विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये घरवापसी करणार होते.
मात्र, त्याआधीच त्यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. बुधवार (दि. 05) रोजी सकाळच्या सुमारास आयकर विभागाचे पथक संजीवराजे यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर तपास सुरु करण्यात आला. यावेळी घराबाहेर मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमा झाले होते.
छाप्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, संजीवराजे नाईक निंबाळकर काही दिवसांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यापूवच हा छापा टाकण्यात आला आहे.