मुंबई ।नगर सहयाद्री:-
राज्यातील काँग्रेस पक्षाचे दोन आमदार शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री (१३ ऑगस्ट) या दोन आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली.
काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे काँग्रेसचे हे दोन आमदार पक्षाला रामराम ठोकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विधानपरिषदेच्या निवडणूकीत क्रॉस वोटिंग कारवाईच्या आधीच हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर पक्षाला रामराम ठोकणार असल्याची चर्चा रंगली आहे.
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठीच्या निवडणुकीत महायुतीचे ९ तर महाविकास आघाडीचे २ उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार उभा केला नसता तर ही निवडणूक बिनविरोध झाली असती. पण तिसर्या उमेदवारामुळे झालेल्या निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली. महाविकास आघाडीची मते फुटल्याचा फायदा भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला झाला. अजित पवार गटाची मते फोडण्याची शरद पवार गटाची रणतीनी यशस्वी झाली नाही.