spot_img
ब्रेकिंगराजकीय वर्तुळात खळबळ! तिसर्‍या आघाडीसाठी 'यांनी' ठोकला शड्डू? राजू शेट्टी, मनोज जरांगेसह...

राजकीय वर्तुळात खळबळ! तिसर्‍या आघाडीसाठी ‘यांनी’ ठोकला शड्डू? राजू शेट्टी, मनोज जरांगेसह एमआयएला..

spot_img

अमरावती । नगर सहयाद्री:-
सरकारकडे आमच्या १८ प्रमुख मागण्या आहेत. त्या जर पूर्ण झाल्या तर आम्ही निवडणूकच लढणार नाही, असे मोठे वक्तव्य प्रहारचे सर्वेसर्वा आणि आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. सरकारने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर ठीक, अन्यथा आम्ही शेतकरी, शेतमजुरांची ताकद महाराष्ट्राला दाखवू.असा इशाराही त्यांनी दिलाय.

आम्ही जातीय समीकरणे जोडून एकत्र येणार नाही. राजू शेट्टी, मनोज जरांगे, एमआयएम सोबत आमचे जे मुद्दे आहेत. त्यावरच एकत्र बसू. अन्यथा आम्ही बसणार नाही. तर वेळ आली तर एकटे लढू. मात्र मुद्द्यांवर ज्या ज्या पक्षाचे एक मत होईल, त्यांच्यासोबत आम्ही लढणार असल्याचेही बच्चू कडू म्हणाले. ते अमरावती येथे बोलत होते.

आमचे मुद्दे हे सर्व जातीमधील शेतकरी कष्टकरी मजुरांचे आहेत. आम्ही इतके मोठे नाही की प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊ किंवा त्यांच्यासोबत जाऊ. तो त्यांचा विषय आहे. सरकारने निर्णय घेतला तर ठीक अन्यथा आम्ही शेतकरी शेतमजुरांची ताकद महाराष्ट्राला दाखवू. आम्ही किमान २० ते २५ जागांवर लढू आणि जिथे जिथे चांगले उमेदवार मिळत आहेत तिथे आम्ही पुढे जाऊ. आमचा मूळ मुद्दा आहे तो शेतकर्‍यांचा. त्या मुद्द्यावर जर सर्व एकत्र आले तर आम्ही नक्कीच सोबत राहू, अन्यथा नाही. असेही बच्चू कडू म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी : तनपुरे, वर्पे यांच्या पाठोपाठ लंके यांचा ईव्हिएम पडताळणीसाठी अर्ज, केली ‘ही’ मागणी

१८ बुथवरील मतांची पडताळणी करण्याची मागणी ८ लाख ४९ हजार ६०० रूपये शुल्क जमा पारनेर /...

बच्चू कडू यांच्याबद्दल विखे पाटीलांचे मोठे विधान

राहाता / नगर सह्याद्री - Radhakrishn Vikhe Patil | Bachchu Kadu : महाराष्ट्रात महायुतीच्या...

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? दिग्गज नेत्यांच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण

मुंबई / नगर सह्याद्री - विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या त्सुनामीपुढे महाविकास आघाडीला पराभवाचा मोठा झटका बसला....

आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून जाऊ नका!; पक्ष सोडण्याची भाषा करणाऱ्यांना राठोड यांचा टोला

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसैनिक हे एकनिष्ठ आहेत. कोणीही तुटणार...