मुंबई । नगर सहयाद्री:-
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन हॅक झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सुप्रिया सुळे यांनी स्वतः आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून या घटनेची माहिती दिली आहे.
रविवारी दुपारी एकच्या सुमारास, सुप्रिया सुळे यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट करताना सांगितले की, “माझा फोन आणि व्हॉट्सअॅप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी.” असे ट्विट केले आहे.
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, सुप्रिया सुळे यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. हॅकिंग प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून, पोलिसांनी यासंदर्भात सखोल तपासणी सुरू केली आहे.