Murder news: आई अन् आजीने मुलीची गुंगीच्या गोळ्या देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना जगताप चाळ परिसरात घडली आहि. याबाबत मुलीच्या मावस आत्याने दिलेल्या फिर्याद दिली आहे. यशस्वी राजेश पवार (वय १७) असे मयत मुलीचे नाव आहे. आई स्नेहल राजेश पवार (वय ३५) आणि आजी सुरेखा महागडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१९ फेब्रुवारीला स्नेहल पवार आणि सुरेखा महागडे यांनी गुंगीच्या गोळ्या देऊन यशस्वी पवार हिला ठार मारले. यशस्वी पवार ही जन्मापासूनच अपंग आणि गतिमंद होती. तिला १५ फेब्रुवारीपासून प्रचंड शारीरिक यातना होऊ लागल्या होत्या. तिच्या या आजारपणाला कंटाळलेल्या आई आणि आजीने 19 फेब्रुवारीला रात्री तिला झोपेच्या गोळ्या दिल्या. झोपेच्या जास्त गोळ्यांचे सेवन केल्यामुळे यशस्वीचा मृत्यू झाला.
यानंतर आई आणि आजीने एका गाडीने तिचा मृतदेह सातारा जिल्ह्यातील परसणी गावात नेला. तिकडे या दोघींनी यशस्वी हिच्यावर अंत्यसंस्कार केले. सुरुवातीला हा प्रकार कोणाच्याही लक्षात आला नव्हता. मात्र, या मुलीची मावस आत्या वर्षा रघुनंदन (वय 42) हिने पोलिसांकडे तक्रार दिल्यामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला. मुलीच्या आजीची चौकशी केली असता यशस्वीचा खून केल्याची कबुली दिली. सदरची घटना ठाण्यातील जगताप चाळ परिसरात ही घटना घडली.