spot_img
ब्रेकिंग'पाणी प्रश्नी महापालिकेचे माजी पदाधिकारी आक्रमक'

‘पाणी प्रश्नी महापालिकेचे माजी पदाधिकारी आक्रमक’

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
सध्या उन्हाळ्याची तीव्रता जाणवत असून, त्यामुळे शहरात पाण्याचा प्रश्न गंभिर झाला आहे. विशेषत: प्रभाग क्र.11 व प्रभाग क्र.14 मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा कमी दाबाने व अपुर्‍या प्रमाणात होत आहे. तरी मनपाने चार दिवसात या भागातील पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा प्रभागातील नागरिकांसह आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनपा माजी स्थायी समिती सभापती अविनाश घुले व माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा आदि उपस्थित होते.

यावेळी आयुक्तांशी झालेल्या चर्चेत अविनाश घुले यांनी प्रभाग 11 व 14 मधील पाण्याची वस्तूस्थिती मांडतांना सांगितले, गेल्या काही दिवसापासून प्रभाग 11 मधील झेंडीगेट, हातमपुरा, धरती चौक, सथ्था कॉलनी, नवजीवन कॉलनी, मार्केट यार्ड तसेच प्रभाग 14 मधील बुरुडगांव रोड, विनायकनगर, माणिकनगर, सारसनगर आदिं भागात पाणी पुरवठ्याबाबत विस्कळीतपणा आलेला आहे.

त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. मनपाच्या मुळा डॅम येथे उन्हाळ्यातील पाण्याची स्थिती पाहता पाणी उपशासाठी एक्ट्रा पंपाची व्यवस्था केलेली आहे. परंतु ऐन उन्हाळ्यात तो पंपही नादुरुस्त झाला आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. पाणी पुरवठ्याचे नियोजनाच्या आभावामुळे नागरिकांचे पाण्यामुळे हाल होत आहेत. तरी तातडीने यात सुधारणा व्हावी, अन्यथा नागरिकांसह आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी गणेश भोसले म्हणाले, उन्हाळ्याची तीव्रता आणि पाण्याची टंचाई यांचे नियोजन प्रशासनाने करणे आवश्यक होते. परंतु प्रशासनने पाण्यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर दुर्लक्ष करतांना दिसून येते आहे. गेल्या महिन्याभरापासून प्रशासनास याबाबत कळविण्यात येत परंतु यात सुधारणा होतांना दिसत नाही. संबंधित अधिकारी व कर्मचारी ही उडवा-उडवीचे उत्तर देत असून, पाणी प्रश्नांचे त्यांना गांभिर्यही नाही. त्यामुळे सुधारणा न झाल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नसेल, असे सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महापालिका वॉर्ड रचनेची प्रतीक्षा संपली; तीन वॉर्डात काय आणि कसे झाले बदल पहा

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाची मान्यता एक हरकत अंशतः मान्य; महानगरपालिकेच्या...

भाजपाचे जेष्‍ठ नेते स्‍व.आ.शिवाजीराव कर्डीले यांना श्रध्‍दांजली अर्पण करण्‍यासाठी सर्वपक्षिय शोकसभेचे आयोजन

अहिल्‍यानगर / नगर सह्याद्री - भाजपाचे जेष्‍ठ नेते स्‍व.आ.शिवाजीराव कर्डीले यांना श्रध्‍दांजली अर्पण करण्‍यासाठी सर्वपक्षिय...

राखेतून फिनिक्ससारखी भरारी — माजी सैनिक नवनाथ खामकर यांचा संकल्प एस. मार्ट पुन्हा उभा

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी किमया श्रीगोंद्यात पाहायला मिळाली...

स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड ताकदीने लढवणार – इंजी. शामभाऊ जरे

श्रीगोंदा / नगर सह्याद्री दिवाळीनंतर होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेड...