जम्मू / नगर सह्याद्री : अपघातही एक भीषण घटना समोर आली आहे. माजी मुख्यमंत्र्यांच्या स्कॉर्पिओला भीषण अपघात झाला आहे. यात स्कॉर्पिओचा पुढील भागाचा चेंदामेंदा झाला आहे.
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या कारला हा अपघात झालाय. मेहबुबा मुफ्ती या काश्मीर खोऱ्यातील जम्मू-काश्मीर येथून अनंतनागकडे चालल्या होत्या. या दुर्घटेने त्यांना कुठेही दु:खापत झाली नसून कारमधील सुरक्षा रक्षकही सुरक्षीत आहेत.
जम्मू-काश्मीरमधील राजकीय पक्ष असलेल्या पीडीएफच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांच्या स्कॉर्पिओ कारला भीषण अपघात झाला. त्यामध्ये, कारचा पुढील भाग तुटल्याचे दिसून येत आहे. सुदैवाने मेहबुबा मुफ्ती बचावल्या असून त्या सुरक्षीत आहेत. यासंदर्भात जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही ट्विट करुन माहिती दिली.
मेहबुबा मुफ्ती साहिबा दुखापतीतून बचावल्या परंतु अपघाताची ही घटना गंभीर आहे. सरकारने अपघाताच्या घटनेची चौकशी, अशी मागणी ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवरुन केली आहे. तसेच, या अपघातातून मुफ्ती यांच्या सुरक्षेसंदर्भात असलेल्या कमींची पूर्तता करावी, असेही अब्दुल्ला यांनी म्हटले.