spot_img
महाराष्ट्रउठता बसताही येईना, मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

उठता बसताही येईना, मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

spot_img

जालना / नगर सह्याद्री : सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा अंतरवली-सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांचा आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे.

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना उठता, बसता येत नाहीय. आवाजही त्यांचा बिघडला आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. पण त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. मनोज जरांगे पाटील शुक्रवारी सकाळी आमरण उपोषणाला बसले. उपोषणा दरम्यान पाणी, अन्न घेणार नाही, असं त्यांनी जाहीर केलं होतं.

मागासवर्गीय आयोगाचा अहवाल स्वीकारून सरसकट आरक्षण द्यावे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी शब्द दिला आहे. गुलाल उधळला आहे. सर्व मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या. बाराशे तेराशे लोकांसाठी वेगळा कायदा करावा. 14 तारखेच्या बंद संदर्भात मला माहित नाही पण तसा काही महाराष्ट्र बंद होत असेल तर शांततेत बंद करावा. 15 तारखेला विशेष अधिवेशन घेतलं नाही तर कळेलच” असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला. अमित शहा यांच्याशी आमचे देणे-घेणे नाही. मराठे काय आहेत त्यांना कळेल असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वक्फ बोर्डबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

३ सदस्य बिगर मुस्लिम राहतील, पण ५ वर्षांची अट नाकारली नवी दिल्ली / वृत्तसंस्था - वक्फ...

मनपा प्रारूप प्रभाग रचना नागरिकांसाठी की सत्ताधाऱ्यांच्या राजकीय सोयीसाठी?

शहरप्रमुख काळेंचा संतप्त सवाल / राजकीय हस्तक्षेपाचा आरोप करत शहर ठाकरे सेनेने घेतली १४...

“रस्त्यावर कचरा नकोच आता…, नाही सहन होणार रस्त्यावरील घाण आता…”

हातात फलक, ओठांवर घोषणा घेऊन नागरिकांची स्वच्छता रॅली अहिल्यानगर / नगर सह्याद्री शहरातील सर्वत्र साचलेल्या...

मराठा आरक्षण; सरकारसमोर मोठं आव्हान; कोर्टात ‘या’ गोष्टी सिद्ध कराव्या लागणार

Maratha Reservation : तर मराठा सामाजासाठी एसईबीसीचा जो मध्यममार्ग सरकारने शोधला होता. त्याचावर वक्रदृष्टी...