spot_img
अहमदनगरयशाचा कळस जरी गाठला तरी पायाला विसरू नका: सुजित झावरे पाटलांनी साधला...

यशाचा कळस जरी गाठला तरी पायाला विसरू नका: सुजित झावरे पाटलांनी साधला निशाणा, पहा काय म्हणाले..

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री:-
प्रत्येकानी आपले कर्म चांगले ठेवले पाहिजे. आयुष्यात यशाचा कळस जरी आपण गाठला तरी ज्याच्या मुळे आपली ओळख आहे. ती पायरी कधी विसरू नये. असे स्पष्ट मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी व्यक्त केले.

पिंपळनेर येथील स्मशानभूमी सुशोभिकरण कामांचा लोकार्पण सोहळा व सेवा सोसायटीच्या कर्जदार सभासदांना २ लक्ष रू. सुरक्षा विमा कवच योजनेचे प्रमाणपत्र वितरण सोहळा सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.  पुढे बोलतांना झावरे पाटील म्हणाले की, पिंपळनेर येथील श्री क्षेत्र निळोबाराय देवस्थान ब वर्गात दर्जा मिळवून देण्यासाठी स्व. मा आ वसंतराव झावरे पाटील व ज्येष्ठ समासेवक अण्णा साहेब हजारे यांच्या प्रयत्नातून झालेले आहे.

बेलदरा पाझर तलाव तसेच गावातील समाजमंदिर स्व. आ. वसंतराव झावरे पाटील यांच्या काळात पूर्णत्वास आली.  सावंत शिर्के वस्ती वरील जोडपुल देखील सुजय दादा विखे पाटील यांच्या माध्यमातून पूर्णात्वाकडे नेणार असल्याचे त्यांनी सांगितले.  एकादशीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पिंपळनेर येथील निळोबारायाच्या दर्शन प्रसंगी देवस्थानचे विश्वस्त यांच्या कडून सुजित झावरे पाटील यांचा सन्मान करण्यात आला.  यावेळी गावातील डिजिटल शाळेची पाहणी करुन विद्यार्थ्यांना शाळेय पॅड वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पठारे, शिरूर येथील मा. नगराध्यक्ष निलेश लटांबळे, संपतराव सावंत, सरपंच देवेंद्र लटांबळे, सतीश पिंपरकर, रविंद्र पाडळकर, संपतराव भापकर, पांडुरंग रासकर, भाऊसाहेब शिर्के, दादासाहेब साठे, बाबुराव नवले, किरण खामकर, गुलाबराव भापकर, शिवाजी भापकर, सचिन शिंदे, एकनाथ पवार, साहेबराव सातपुते, मच्छिंद्र लटांबळे, श्रीरंग रासकर, श्रीरंग गाजरे, सिताराम कळसकर, खंडू पोटे, लक्ष्मण रासकर, कांतीलाल रासकर, सुभाष रासकर, सुभाष जेकटे, संतोष लटांबळे, किसन रासकर, शैलेश गाजरे, संजय सालके, अमोल वाघुले, रघुनाथ कळसकर, मान्यवर मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घार्गे साहेब; ‌‘खाकी‌’चं ‌‘खमकं पोलिसिंग‌’ कधी?

  गुन्ह्याला अटकाव करणारी मजबूत बांधबंदिस्ती कधी? गुन्ह्यातील ‌‘रिस्पॉन्स टाइम‌’ महत्त्वाचा अन्‌‍ तेच खरे पोलिसिंग! सारीपाट...

पुन्हा धो धो पाऊस; नगरसाठी ‘यलो अलर्ट’

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक ३ ते ४ ऑक्टोबर...

दुहेरी भूमिका घेणाऱ्यांमुळे मोठी अडचण; पारनेरच्या मेळाव्यात अजित पवार यांनी कुणाला काढला चिमटा?, वाचा सविस्तर

पारनेर | नगर सह्याद्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकासकामे आणि राजकारण यावरून आपल्या पक्षातील सहकारी,...

महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे व गवई गटांमध्ये खलबते; किरण काळे व सुशांत म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती

अहिल्यानगर। नगर सहयाद्री महानगरपालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना लवकरच जाहीर होणार आहे. मागील आठवड्यात मातोश्री...