नगर सह्याद्री टीम-
कोणताही व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवलाची गरज असते. परंतु आज आम्ही तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी काही मार्ग सांगत आहोत ज्यामध्ये तुम्ही कमी गुंतवणूक करून लाखो रुपये कमाऊ शकता.
स्ट्रीट फूड व्यवसाय : आपण कुठेतरी फिरण्यासाठी गेलो की, आपली नजर सर्वात आधी रस्त्यावरील दुकानांकडे जाते, अरे! तिथे काय विकले जाते? चल, जाऊन पाहूया. गरमागरम कचोरी किंवा बर्गर-चॉमीन पाहून आपल्याला खाण्याची उच्च होते. हे सध्या मोठ्या प्रमाणावर विकले जाते. तसेच लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण स्ट्रीट फूडचा आस्वाद घेतात. त्यामुळे हा व्यवसाय चालू केला तर अधिक नफा कमावू शकतात.
रेस्टॉरंट व्यवसाय : रेस्टॉरंट हा एक उत्तम पर्याय आहे. या व्यवसायामध्ये एकदा पैसे गुंतले की दोन-तीन वर्षांत सहज पैसे अधिक नफा कमाऊ शकतो. जर तुम्ही वेळेनुसार अपडेट केले तर तुम्ही वर्षानुवर्षे रेस्टॉरंटमधून अधिक कमाई होऊ शकते.
नमकीन दुकान : नमकीन हा एक साधा नाश्ता असून नागरिकांची त्याला मोठ्या प्रमाणात पसंती आहे. आजच्या काळात नमकीन दुकानची क्रेझ अधिक वाढत आहे. तुम्ही हा व्यवसाय सुरू करून अधिक पैसेही कमवू शकता.