spot_img
ब्रेकिंगगोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही!: जरांगे, मुंबईत पोहचण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांचं मोठं आश्वासन

गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही!: जरांगे, मुंबईत पोहचण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांचं मोठं आश्वासन

spot_img

जुन्नर | नगर सह्याद्री
अजूनही तुमच्या हातातून वेळ गेली नाही. गोरगरिबांची मनं जिंकण्यांची मुख्यमंत्र्यांकडे योग्य संधी आहे. तुम्ही आमचे वैरी नाहीत, शत्रू नाहीत. फक्त आठमूठे भूमिका सोडून द्या., असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. आम्ही आरक्षणासाठी भांडत आहोत. ते पण लोकशाही मार्गाने. आजपासून मराठ्यांविषयी भूमिका बदला. सत्ता दिली मराठ्यांनी आणि उलटले मराठ्यांवरच. मराठा समाजाला जाणून बजून टार्गेट केले जात आहे. आरक्षण दिल्यानंतर मराठा समजा सन्मान करेल. आताच अंमलबजावणी करा. मराठा समजााला आणि मला मुर्ख बनवत आहेत. जाणून बुजून अपमान करत आहेत. तुम्ही गोळ्या घातल्या तरी मनोज जरांगे झेलणार. पण मागे हटणार नाही, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे.

‌‘मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोर्चा काढला असून ते मुंबईला निघाले आहेत. मनोज जरांगे हे आंदोलनावर ठाम आहेत. सध्या ते जुन्नरमध्ये असून किल्ले शिवनेरीच्या पायथ्यावर नतमस्तक होऊन ते मुंबईकडे रवाना होणार आहे. मुंबईला निघण्यापूव त्यांनी मराठा बांधवांशी संवाद साधला आणि पत्रकार परिषद घेतली.या पत्रकार परिषदेतून त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. साठी एक दिवसाची वेळ देणं ही चेष्टा आहे. आमचा हट्ट नाही. पण मागण्या मान्य करा. समाजाच्या वेदना मुख्यमंत्र्यांनी समजून घ्याव्यात. निर्णय कोर्टाचा नाही, तर तुमच्याच हातात आहे. फडणवीस आंदोलकांना थांबवणार नाहीत, त्यांचा सन्मान करतील. अजूनही तुमच्या हातातून वेळ गेली नाही.

गोरगरिबांची मनं जिंकण्यांची फडणवीसांकडे योग्य संधी आहे. तुम्ही आमचे वैरी नाहीत, शत्रू नाहीत. फक्त आठमूठे भूमिका सोडून द्या.जरांगेंनी यावेळी मराठा आंदोलनकांना आवाहन केले की, जे काय नियम आहेत ते मराठा पाळणार. एक दिवस देता आंदोलनासाठी तर एका दिवसात अंमलबजावणी करा. मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊन पुढे काय होईल हे लक्षात घ्या. महायुतीला मराठ्यांशिवाय यश मिळवणं कठीण होते. आझाद मैदानावर मी आमरण उपोषण करणार आहे. 29 ऑगस्टला सकाळी आमरण उपोषण सुरू करणार आहे. मराठ्यांनी संयम ठेवायचा. गडबड गोंधळ करू नका. कोणतीही चूक करू नका.

मराठ्याच्या सर्व पोरांनी शांततेत घ्यावे. लढताना फक्त संयमाने आणि शांततेने लढा. आंदोलनात खंड पडून देऊ नका. तसंच, फडणवीससाहेब तुम्ही आम्हाला अट घालू नये. 5000 लोकांची आणि एक दिवसाच्या आंदोलनाची अट घालू नये. ज्यांची आंदोलनासाठी येण्याची इच्छा आहे त्यांना येऊ द्या. अटी घालू नका. सर्व अटी-शथ काढाव्यात., असे आवाहन जरांगेनी फडणवीसांना केल

नेप्ती बायपास चौकात भर पावसात जरांगे पाटलांचे भव्य स्वागत
मराठा आरक्षण प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर अंतर्वली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे पाटील यांचे रात्री एक वाजता नेप्ती बायपास चौकात आगमन झाले. यावेळी पाऊस सुरु असतांनाही हजारो मराठा बांधवांनी जरांगे पाटलांचे पावसात भव्य स्वागत केले. गुरुवारी (दि 28) पहाटे सव्वापाच वाजण्याच्या समोरास आळेफाटा (ता जुन्नर) येथे आगमन झाले. फुलांची उधळण करत, फटाक्यांच्या आतषबाजीत, एक मराठा लाख मराठाच्या जयघोषणात त्यांचे येथे भव्य असे स्वागत करण्यात आले. गुरूवारी पहाटेच्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांचे पुणे जिल्ह्यात आगमन झाले. जिल्ह्याच्या सरहद्दीवरील आणे, पेमदरा, बेल्हे, राजुरी व ठिकठिकाणी स्वागतानंतर ते आळेफाटा परिसरात आले. आळे, संतवाडी, कोळवाडी, आळेफाटा, वडगाव आनंद येथील सकल मराठा समाज व सर्व समाज बांधव यांचे वतीने भव्य असे स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मनोज जरांगेंच्या सहकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
आंदोलनादरम्यान मनोज जरांगे यांच्या एका सहकाऱ्याचा मृत्यू झाला. अंतरवाली सराटीवरून निघालेला जरांगेचा मोर्चा गुरुवारी सकाळी जुन्नरमध्ये दाखल झाला. या मोर्चादरम्यान हृदविकाराचा झटका येऊन जरांगेंच्या सहकाऱ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. याआधी जरांगेंचा मोर्चा निघण्यापूव मराठा आरक्षणासाठी लातूरमधील एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. या दोन्ही घटनांवर मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया देत दु:ख व्यक्त केले. मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाचा दुसरा दिवस आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील मराठा बांधवांनी मोठ्यासंख्येने किल्ले शिवनेरी येथे गद केली होती. या मराठा बांधवांमधील एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सतिश ज्ञानोबा देशमुख (वय 40 वर्षे) असं या मृत आंदोलकाचे नाव आहे. सतिश देशमुख हे मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चासोबत मुंबईला जाणार होते. पण मोर्चा मुंबईच्या दिशेने निघण्यापूवच त्यांचा हृदविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

‌‘मनोज जरांगे यांनी आंदोलन स्थगित करावे’; मंत्री विखे
मनोज जरांगे यांची शिष्टमंडळाच्या माध्यमातून भेट घेण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. समाजाच्या मागण्यांसाठी सरकार संवेदनशील आहे. हैदराबाद गॅझेटवर न्या. शिंदे समितीचा अभ्यास सुरू आहे. त्यांचा अहवाल येईपर्यंत जरांगे यांनी आंदोलन स्थगित करावे, असे आवाहन राज्य सरकारच्यावतीने त्यांना करण्यात आले आहे,” अशी माहिती जलसंपदामंत्री तथा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.ते म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले; परंतु राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे आरक्षण टिकविता आले नाही. महायुती सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षण टिकून आहे. न्या. शिंदे समितीला मुदतवाढ देऊन हैदराबाद गॅझेटसंदर्भातील अहवाल तातडीने सादर व्हावा, असाच सरकारचा प्रयत्न आहे. ही प्रक्रिया थोडीशी गुंतागुंतीची आहे. यामुळे कोणावरही अन्याय व्हायला नको. मराठा आरक्षणाच्या संदर्भात समाजाच्या भावना तीव्र आहेत. लोकभावनेचा आदर करणे सरकारचे काम आहे.

मुंबईच्या वेशीवर पोहचण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांचं आरक्षणाबाबत मोठं आश्वासन
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेृत्वाखाली मराठा बांधव मोर्चा घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मनोज जरांगेंच्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्यने राज्यभरातील मराठा बांधव सहभागी झाले आहेत. जुन्नरमधून मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे. मुंबईच्या वेशीपर्यंत मनोज जरांगे पाटील पोहचण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाबाबत मोठं विधान केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलनावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘आरक्षणावरून कुणावर अन्याय होणार नाही. ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही. मराठा समाजाने लक्षात घ्यावे की त्याचे प्रश्न आम्हीच सोडवले आहेत. आमच्याच सरकारने त्यांचे प्रश्न सोडवले आहेत. यापुढेही आम्हीच त्यांचे प्रश्न सोडवणार आहोत. मराठा समाजाचे प्रश्न आम्हीच मार्गी लावले आहेत. आरक्षणाबाबत कुणावरही अन्याय होणार नाही कारण ईडब्ल्यूएसमुळे अनेक प्रश्न सुटलेले आहे. मराठा समाजाला आपण आरक्षण दिलंय आणि ते कोर्टातही टिकलंय.’
मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. याबाबत फडणवीस म्हणाले की, ‘सगळ्यांना आपली मत मांडण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. लोकतांत्रिक पद्धतीने जेवढी आंदोलनं होतील त्याला आमचा ना नाही. त्याला आम्ही सामोरे जाऊ. त्यावर चर्चा करू आणि योग्य मार्ग काढू.’ दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यावर ठाम आहेत. उपोषणासाठी कोणत्याही अटी-शर्थी लावू नये असे आवाहन त्यांनी सरकारला केले आहे.

…तर त्यांचं मोठं नुकसान होईल, फडणवीसांनी नेमका कोणाला दिला इशारा?
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे, आम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे अशी मराठा समाजाची मागणी आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधव एकवटले आहेत, मुंबईमध्ये आंदोलन होणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस?
आंदोलनासाठी जे नियम निकष केले आहेत, त्या नियमानुसार हे आंदोलन झालं तर आम्हाला काही अडचण नाहीये, आज आपल्याला माहिती आहे की, जवळपास साडेतीनशे जाती या ओबीसीमध्ये आहेत. आणि समजा आता आपण मेडिकलच्या प्रवेशाबाबत बघितलं तर ओबीसीचा कटऑफ हा एसीबीसीच्यावर आहे. एसीईबीसीचा कट ऑफ हा इडब्ल्यूएसच्यावर आहे, त्यामुळे या मागणीमुळे नेमकं किती भलं होणार आहे, याची मला कल्पना नाही. आपण जर आकडेवारी नीट बघितली तर मराठा समाजाच्या हिताचं काय आहे, हे आपल्या लक्षात येईल असं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की मराठा समाजाची देखील ही जबाबदारी आहे की, त्यांनी मराठा समाजाच्या हिताचा अभ्यास करून त्या ठिकाणी मागणी केली पाहिजे. मात्र एक गोष्ट खरी आहे, की एसीईबीसी आरक्षणामध्ये राजकीय आरक्षण मिळणार नाही, राजकीय आरक्षण हा जर हेतू असेल तर मात्र गोष्ट वेगळी आहे. जर राजकीय आरक्षण हा हेतू नसेल आणि सामाजिक, आर्थिक परिवर्तनाची जर लढाईल असेल, नोकरी मिळाली पाहिजे, प्रवेश मिळाला पाहिजे तर मात्र या मागणीचा विचार किमान काही विचारवंतांनी तरी केला पाहिजे, असंही यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की यापूर्वी काय झालं हे तुम्ही सर्वांनी बघितलं आहे, आजही आंदोलनासाठी रिसोर्सेस उभे करणारे कोण आहेत? हे पाहायला मिळत आहे, पण ठीक आहे. माझं म्हणणं काय आहे, की आमच्यासाठी हे आंदोलन राजकीय नाही, आम्ही याला सामाजिक चष्म्यातून पाहू, काही राजकीय पक्ष हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांचं नुकसान होईल, फायदा होणार नाही, असा इशाराही विरोधकांना यावेळी फडणवीस यांनी दिला आहे.

मराठा, ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे, ते कोर्टातही टिकलं आहे. कोणाचंही आरक्षण काढून घेणार नाही, लोकशाहीच्या चौकटीबाहेर कुणीही जाऊ नये. मराठा समाजाच्या नेत्यांनी अभ्यास करून मागणी करावी, असंही यावेळी फडणवीस यांनी म्हटलं.

छत्रपतींच्या विचारांवर चालणाऱ्या मराठ्यांवर सरकार गोळ्या घालणार का? जरांगे यांचे टीकास्त्र
सरकारच्या हातात असताना,न्यायदेवतेची मध्यस्थी कशाला अशा शब्दांत मराठा मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला फटकारले,मुंबईच्या आझाद मैदानावरून मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला मार्गस्थ होण्यापूर्वी किल्ले शिवनेरीची माती कपाळी लावून त्यांनी मराठा आरक्षणासाठी प्रसंगी मरण्याचीही तयारी ठेवल्याचे स्पष्ट केले.

मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख,आंतरवालीचे सरपंच पांडूरंग तारख,हनुमान मुळीक,ज्ञानदेव काशिद,गंगाधर काळकुटे,बद्रीनाथ तारख,संजय गोडसे, जुन्नरमधील विविध पक्षांचे नेते सत्यशील शेरकर,ज्ञानेश्वर खंडागळे,मकरंद पाटे,सूरज वाजगे, सकल मराठा समाजाचे गणेश महाबरे,संदेश बारवे, सुनिल ढोबळे,प्रवेश देवकर आदी यावेळी उपस्थित होते. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत शिवनेरी मार्गावर आंदोलकांनी मराठा आरक्षण घेणारच असा एल्गार केला. (Latest Pune News)

किल्ले शिवनेरीच्या पायथ्यापासून पारंपरिक वाद्यांच्या गजरात आंदोलक कार्यकर्ते शिवाई देवी मंदिरात आल्यानंतर, मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते देवीची आरती झाल्यानंतर,ते शिवजन्मस्थळी नतमस्तक झाले.तेथील माती कपाळी लावून,आरक्षणाची लढाई आता आरपार असेल असे घोषीत केले.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना,त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. गरीब मराठ्यांचा अपमान करू नका,त्यांची मने जिंका असे सांगून खरं तर सत्ता दिली मराठ्यांनी पण तुम्ही उलटले मराठ्यांवर या शब्दांत जहरी टीका त्यांनी केली.

मराठा समाजाच्या लेकरांच्या वेदनांना न्याय देण्यासाठी ही लढाई सुरु आहे.रायगड आणि शिवनेरी ही प्रेरणास्थळे आहेत. येथे आल्यानंतर यश मिळते हा इतिहास असल्याचे सांगून मराठा विरोधी आडमूठी भूमिका सोडून द्या,असा ईशारा राज्य सरकारला दिला.

आम्ही तर आरक्षण मिळवणारच आता थांबणार नाही असे सांगून जर एक दिवसाचे उपोषण करायला सांगता तर एक दिवसात आमच्या मागण्या का मान्य करत नाहीत,वारंवार माझ्या समाजाचा माझा अपमान करतात कारण मी मॅनेज होत नाही,हे त्यांचे दुख आहे.छत्रपतींच्या विचारावर चालणारे सरकार छत्रपतींच्या विचारांवर चालणाऱ्या मराठ्यांवर गोळ्या घालणार का हा प्रश्न आहे असे ते म्हणाले.

आमचे आंदोलन कायदा आणि न्यायालयाने दिलेले नियम पाळून सुरु आहे.आम्ही कायदा तोडत नाही.पण आमच्या आंदोलनाला तुम्ही हात लावाल तर माझा समाज महाराष्ट्रभर आहे हे सरकारने ध्यानात घ्यावे असा इशारा त्यांनी दिला.या आंदोलनामुळे गणेशोत्सवात अडथळा होत असल्याचा आरोप होत आहे,यावर बोलताना अडथळा करायला आमच्या हातात बंदुका आहेत का असा प्रतीप्रश्न जरांगे यांनी केला.

हिंदुंचा सण असून तुम्ही मुंबईला चाललात म्हणणारे ज्यावेळी आंतरवालीत आंदोलन सुरु होते,त्यावेळी गणपती बसले नव्हते का,मग हिंदूंच्या सणाच्या वेळी लाठीचार्ज केला ते सरकारला चालते का असे सांगून आम्ही गोळ्या झेलायला तयार मात्र आरक्षणासाठी हटायला तयार नाही,मराठ्यांच्या हक्काच्या ओबीसी आरक्षणातून आरक्षणाचा विचार सरकारने करावा असा पुनरुच्चार त्यांनी केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाराष्ट्रात हळहळ! दुर्घटनेत १७ जणांचा अंत, काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - विरारच्या नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा काही...

तुम्ही त्यांना डोक्यावर घेतलं, त्यांचा खर्चपाणी तिथूनच चालतो, ते तुम्हाला काय पाणी देणार?, माजी खासदार विखेंची खासदार लंके यांच्यावर टीका!

कान्हूरपठार। नगर सहयाद्री:-  पठार भागाला पाणी मीच देणार, असे आश्वासन माजी खासदार सुजय विखे पाटील...

मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम, सरकार सावध, विखे पाटील म्हणाले, आम्ही…

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आज मुंबईच्या दिशेने...

सासऱ्यासह पत्नीवर कोयत्याने सपासप वार; सावेडी उपनगरात दारुड्या पतीचा भयंकर कांड

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सावेडी उपनगरातील वैदुवाडी येथे दारुच्या नशेत पती अर्जुन राजू शिंदे याने...