spot_img
अहमदनगर'रोजगारासाठी एसईझेड उभारा' किरण काळे यांची मुख्यमंत्री, उद्योग मंत्र्यांकडे मागणी

‘रोजगारासाठी एसईझेड उभारा’ किरण काळे यांची मुख्यमंत्री, उद्योग मंत्र्यांकडे मागणी

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या माहितीतून धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पुण्याच्या हिंजवडी आयटी हब मधून ३७ कंपन्या महाराष्ट्रा बाहेर गेल्या आहेत. त्यापैकी ४ कंपन्या नगरला आल्या असत्या तर नगर मधील हजारों मुला, मुलींना रोजगार, व्यापारी, बाजारपेठेला चालना मिळाली असती, असे शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी म्हटले आहे.

नगरच्या तरुणांच्या रोजगारा करिता विस्तारित एमआयडीसी मंजूर करत आयटी पार्कसाठी स्पेशल इकॉनॉमिक झोन (एसईझेड) उभारणीची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे काळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. इन्फोसिस, टीसीएस, कॉगनीझंट, विप्रो यासह अनेक मोठमोठ्या आयटी कंपन्या पुण्यात आहेत. एकट्या हिंजवडीत आयटी हबमध्ये सुमारे पाच लाख तरुणांना रोजगार आहे. केवळ ट्राफिक जामच्या समस्येमुळे सदर कंपन्या महाराष्ट्रा बाहेर हैदराबाद, बंगलोर, चेन्नईकडे स्थलांतरित झाल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी वेदांता फॉसकॉन कंपनी गुजरातला गेली.

काय आहे एसईझेड?
सध्याच्या एमआयडीसीमध्ये मोठ्या कंपन्यांना लागणार्‍या क्षेत्राची उपलब्धता नाही. नगर शहरातच रोजगार मिळवून देण्यासाठी आयटी पार्कची उभारणे करणे आवश्यक आहे. त्याकरिता नगर शहरा लगत पडीक जिरायती क्षेत्र निश्चित करून संबंधित शेतकर्‍यांना योग्य तो मोबदला देत नव्याने जमिनीचे अधिग्रहण सरकारने एसईझेड जाहीर करत करावे. हा एसईझेड केवळ आयटी पार्कसाठी असावा. आयटी पार्कसाठी लागणार्‍या सर्व पायाभूत सुविधांचा अंतर्भाव यामध्ये केला जावा. एसईझेडची उभारणी झाल्यास त्यामध्ये वेगवेगळे झोन तयार केले जाऊ शकतील. इंडस्ट्रियल पार्क, इकॉनॉमिक आणि टेनॉलॉजी डेव्हलपमेंट झोन, हायटेक झोन, सायन्स आणि टेनॉलॉजी पार्क, याला लागूनच एअरपोर्ट, लझुरियस हॉटेल्स, मॉल्स, एंटरटेनमेंट झोन, उत्तम अंतर्गत रस्ते, २४ तास पाणी व विजेचा पुरवठा, कंपन्यांना टॅस मध्ये मोठी सूट, इंटरनेट सुविधे करिता फायबर ऑप्टिकल केबलचे परिपूर्ण नेटवर्क या बाबी एसईझेडच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने मदत करावी असे काळे यांनी म्हटले आहे.

व्यापारी, बाजारपेठेला चालना मिळेल
सद्यस्थितीत शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ तसेच उपनगरांतील व्यापारी व्यवसायात असणार्‍या मंदीमुळे हवालदिल आहेत. शहरात सरकारी व खाजगी नोकरदार, स्वयंरोजगारातून उत्पन्न कमावणारे, एमआयडीसी क्षेत्रात काम करणारे घटक हे बाजारपेठेसाठीचे ग्राहक आहेत. जोपर्यंत एमआयडीसी वाढणार नाही, रोजगार निर्मिती होऊन ग्राहकांच्या खिशामध्ये पैसे येणार नाहीत तोपर्यंत ते बाजारात खर्च करू शकणार नाहीत. शहरातील व्यापारी, व्यावसायिक टिकायचे असतील तर पुढील पन्नास वर्षांचे व्हीजन ठेवून शहर विकासाचा आराखडा तयार करण्याची गरज आहे. यासाठी सकारात्मक प्रयत्न सरकार दरबारी करणार असल्याचे काळे यांनी म्हटले आहे. आयटी पार्क एसईझेड उभारणीमुळे हजारो घरांची राहण्यासाठी गरज निर्माण होईल. त्यामुळे आर्किटेट, बिल्डर्स, रियल इस्टेट मधील गुंतवणूकदार यांच्यासाठी घरे उपलब्ध करून देण्याची संधी मिळेल. यामुळे रियल इस्टेट सेटर, पतपुरवठा करणार्‍या बँकिंग संस्था, चार्टर्ड अकाउंटंट यांना बूम मिळू शकेल.

त्या ३७ कंपन्यांच्या स्थलांतराचा नगरच्या तरुणांवर परिणाम
नगर शहरातून दरवर्षी हजारो तरुण, तरुणी अभियांत्रिकी शिक्षणासाठी पुण्याकडे स्थलांतरित होतात. शिक्षणानंतर त्यांना हिंजवडी आयटी पार्क मध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी असते. मात्र ३७ कंपन्यांच्या स्थलांतरामुळे नगर मधील अनेक मुलांना देखील याचा फटका बसला असल्याचा दावा शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Politics News:”मंत्री विखे पाटील यांच्या नियोजनामुळे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण”

Politics News: संगमनेर, निळवंडे कालव्यांचे पाणी आल्याने अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण होत आहे. पालक...

Ahmadnagar Politics:नगर जिल्ह्यात शिवसेनेला धक्का! तालुकाप्रमुख ‘कमळ’ हाती घेणार?

Ahmadnagar Politics: नगर जिल्ह्यात शिवसेनेला धक्का बसला आहे. जामखेड शिवसेना तालुकाप्रमुख (उबाठा) संजय काशिद...

साकळाई योजनेसाठी शेतकरी आक्रमक; कृती समितीचा पुढाऱ्यांवर हल्लाबोल, पाचपुते यांनीच केला घोळ…, शेलार, कार्ले, हराळ काय म्हणाले पहा…

'साकळाई'च्या आड येणारे झारीतील शुक्राचार्य ओळखा कृती समितीचा खडकी येथे रास्तारोकोत इशारा | सिंचनभवनवर मोर्चा...

धक्कादायक! चुलत्या-पुतण्यावर धारधार हत्याराने सपासप वार! ‘ते’ कारण आलं सामोरे..

अहमदनगर। नगर सहयाद्री:- चुलत्या-पुतण्यावर धारधार हत्याराने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना नगर तालुक्यात घडली आहे....